Sunday, May 19, 2024
Homeजळगावपीजे रेल्वे सुरू न झाल्यास आंदोलन ; कृती समितीचा इशारा

पीजे रेल्वे सुरू न झाल्यास आंदोलन ; कृती समितीचा इशारा

पाचोरा – प्रतिनिधी pachora

पीजे (pj) रेल्वे सुरु करण्यासाठी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी १ फेब्रुवारी रोजी (Delhi) दिल्ली गाठून (Minister of State for Railways) रेल्वे राज्यमंत्री (Raosaheb Danve) रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन त्याच्याशी पीजे रेल्वे कश्या प्रकारे गोरगरीब लोकांसाठी गरजेची आहे या विषयावर दिड तास चर्चा केली.

- Advertisement -

यावेळी पीजे रेल्वे पुन्हा सुरू करण्यासाठी रेल्वेचा सुमारे २४ कोटी रुपयांचे खर्च लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पीजे चा पाचोरा ते जामनेर पर्यंत विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव झाला नाही.असे कृती समितीचे अध्यक्ष खलील देशमुख यांनी येथील हुतात्मा स्मारकात पत्रकार परिषदेचे आयोजन करुन माहिती दिली.

यावेळी समितीचे सदस्य अँड.अविनाश भालेराव, अँड. अभय पाटील, अँड.अण्णा भोईटे, सेवानिवृत्त वाणिज्य प्रमुख आर.पी.बागुल, विलास जोशी, मनिष बाविस्कर, रणजित पाटील, पप्पू राजपूत, प्रताप पाटील, अनिल येवले उपस्थित होते. यावेळी सदस्यांनी माहिती देताना सांगितले की, पीजे रेल्वे पुर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व खासदार उन्मेष पाटील यांची सकारात्मक भुमिका आहे. त्यांनी रेल्वेच्या भुसावळ व दिल्ली येथील अधिकाऱ्यांना खडसावून तातडीने कारवाई करण्याच्या सुचना दिल्याचे सांगितले.

कृती समिती यावरच विसंबून न राहता येत्या काही दिवसांत पाचोरा ते जामनेर दरम्यान येणाऱ्या पीजे रेल्वे प्रवाशी यांचेही चर्चा करुन कोरोना व्हायरसचे वातावरण पाहून भव्य मोर्चा काढला जाणार आहे. व यानंतर रेलरोको करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या