नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Eelction) त राज्यात कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aaghadi Government) येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) खासदार अमोल कोल्हे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने राज्यात शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असून सदरची यात्रा आज देवळाली मतदारसंघात होती.
हे देखील वाचा : Uddhav Thackeray : “बाजारबुणगे महाराष्ट्रात येऊन…”; उद्धव ठाकरेंचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल
या यात्रेचे देवळालीत जोरदार स्वागत झाल्यानंतर विहितगाव येथील साई ग्रँड लॉन्समध्ये देवळाली मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे हजर होते, त्यांचे प्रमुख भाषण या मेळाव्याला होणार होते. मात्र, भाषणाला उभे राहिल्यानंतर त्यांनी सर्व इच्छुक उमेदवारांची ओळख करून दिली व त्यानंतर त्यांनी आपले भाषण न करता सर्व वक्त्यासह व्यासपीठावरील खाली असलेल्या खुर्च्यांमध्ये जाऊन बसले. त्यानंतर मात्र त्यांचे भाषणच झाले नसल्याने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. या शिवस्वराज्य यात्रेला इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांचीच गर्दी होती.
हे देखील वाचा : Sanjay Raut : “अमित शाह उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेताय याचा अर्थ…”; संजय राऊतांचे टीकास्त्र
यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) म्हणाले की, “विरोधकांना वाटत होते की लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला उमेदवार (Candidate) मिळणार नाही. मात्र, पवार साहेबांनी दहा उमेदवार दिले आणि त्यातील तब्बल आठ उमेदवार निवडून आले, त्यामुळे या राज्यात शरद पवारांचा करिष्मा अद्यापही टिकून आहे. राज्यातील जनता शरद पवारांच्या पाठीशी असल्याचे लोकसभेच्या निवडणूक (Loksabha Election) निकालाने दाखवून दिले, तुतारी शिवाय आता राज्यात पर्याय नाही “, असे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची ‘जोर’ धार; नागरिकांची धावपळ
पुढे बोलतांना कोल्हे म्हणाले की, “देवळाली मतदारसंघात (Deolali Constituency) आपली मोठ्या प्रमाणात ताकद असून ही ताकद येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दाखवून द्या. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार आहे, मात्र उमेदवारी कोणालाही मिळाली तरी एकसंघ राहा व महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणा”, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे युवकाध्यक्ष मेहबूब शेख, दिंडोरीचे खासदार भगरे व इतरांची भाषणे झाली.
हे देखील वाचा : Accident News : कार आणि ट्रकचा भीषण अपघात; सात जण जागीच ठार
दरम्यान, यावेळी देवळालीतील विलास पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला, त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व इतरांनी स्वागत करून सत्कार केला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन शेलार यांनी केले. यावेळी व्यासपीठावर श्रीराम शेटे, कोंडाजीमामा आव्हाड, रामकृष्ण झाडे, अशोक पाटील मोगल, सचिन आहेर, रतन चावला, नितीन भोसले, जगदीश गोडसे, गोकुळ पिंगळे, अविनाश अरिंगळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा