Friday, November 22, 2024
Homeनाशिकगणवेशांपासून विद्यार्थी वंचित; खासदार भगरेंची राज्य सरकारवर टीका

गणवेशांपासून विद्यार्थी वंचित; खासदार भगरेंची राज्य सरकारवर टीका

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

दरवर्षी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना (Students) गणवेश, पाठ्यपुस्तक व इतर वैयक्तिक लाभांच्या योजनांचा लाभ देवून शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. नवागत विद्यार्थ्यांचे लेखन साहित्य, गणवेश देवून स्वागत केले जाते. मात्र यावर्षी विद्यार्थी पहिल्याच दिवशी गणवेश योजनेपासून राज्यातील लाखो विद्यार्थी वंचित राहिल्यामुळे खासदार भास्कर भगरे (MP Bhaskar Bhagare) यांनी सरकारच्या ‘एक राज्य एक गणवेश’ या फसलेल्या योजनेवर सडकून टीका केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Fraud News : मनी लाँन्ड्रिंगच्या नावाखाली सेवानिवृत्त व्यक्तिस लाखोंचा गंडा

महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये शिकणार्‍या लाखो गोरगरीब विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित ठेवणारे हेच का गतिमान सरकार? असा उपरोधिक टोला देत राज्य शासनाच्या कारभारावर खा. भास्कर भगरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तरी शासनाने विद्यार्थ्यांना त्वरीत गणवेश देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी खा. भगरे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
या नवीन शैक्षणिक वर्षांपासून (Academic Years) राज्य शासनाने ‘एक राज्य एक गणवेश’ ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. यंदा मोफत गणवेश वाटपात बदल करुन प्रत्येक शाळेला कापड पुरवण्याचा झालेला निर्णय हा गोंधळाचा ठरला आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांचे स्वागत जुन्या कपड्यात झाल्याने नवागतांच्या स्वागताला नाराजीची झालर लागल्याच्या प्रतिक्रिया पालकांमध्ये उमटत आहेत.

हे देखील वाचा : महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक एकत्रित लढवणार – उद्धव ठाकरे

राज्य शासनाने यावर्षीपासून ‘एक राज्य एक गणवेश’ ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. सुमारे १० ते १२ वर्षांपुर्वी कापड ठेकेदार व शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्या कापड घोटाळा आजपर्यंत चर्चेचा ठरलेला असतांना राज्य शासनाने पुन्हा एकदा कापड पुरविण्याचा निर्णय घेतल्याने एकच आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या कापड पुरविण्याच्या निर्णयाला सर्वस्तरातून विरोध होत असल्याने हा निर्णय बदलण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे गणवेश वाटपाचे कोणतेही नियोजन झाले नसल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. पुन्हा शालेय व्यवस्थापन समित्यांना सर्व अधिकार देवून गणवेश वाटप व्हावे, अशी मागणी केली जात आहे.

हे देखील वाचा : Nashik News : पोलिस निरीक्षक झाले ‘एसीपी’; गृहविभागाकडून १३९ अधिकाऱ्यांना बढती

तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या १ ली ते ८ वी च्या वर्गातील सर्व मुले-मुली यांना प्रत्येकी दोन गणवेशाचा लाभ मिळतो. परंतु यंदाच्या निर्णयाने गोंधळ निर्माण झाल्याने शाळेचा पहिला दिवस जुन्या कपड्यांमध्येच साजरा करण्याची वेळ प्रत्येक शाळेवर आली आहे. यामुळे पालक वर्गांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून शासनाने त्वरीत ठोस निर्णय घेवून पुन्हा एकदा शालेय व्यवस्थापन समितीला अधिकार देवून विद्यार्थ्यांपर्यंत तत्काळ गणवेश पोहोचतील, याची व्यवस्था करावी, अशी मागणी खासदार भास्कर भगरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या