Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडी विधानसभा निवडणूक एकत्रित लढवणार - उद्धव ठाकरे

महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक एकत्रित लढवणार – उद्धव ठाकरे

मुंबई | Mumbai

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) निकालानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण याठिकाणी बैठक पार पडली. या बैठकीस ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. मविआच्या नेत्यांची या सदर बैठकीत लोकसभेच्या निकालाबाबत चर्चा झाली. यासोबत पुढील चार महिन्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात देखील चर्चा झाली. त्यानंतर मविआच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत मविआची विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत भूमिका स्पष्ट करत पंतप्रधान मोदींसह भाजपवर टीकास्त्र सोडले.

हे देखील वाचा : महायुतीची नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ बैठक संपन्न

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, “आम्ही विधानसभेसाठी लवकरात लवकर निर्णय घेणार आहोत. ज्याप्रमाणे आम्ही लोकसभेमध्ये लढलो, त्याच्या अधिक ताकदीने विधानसभेत (Vidhansabha) लढणार असून ही विधानसभा निवडणूक एकत्रित लढवणार आहोत, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. तसेच तिन्ही पक्षाची विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठक झाली असून महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) सगळे आलबेल असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

तसेच शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात १८ सभा आणि एक रोड शो घेतला. या सर्व ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेने भरभरुन प्रतिसाद दिला. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीतही पंतप्रधान मोदी (PM Modi) जितक्या जास्त सभा घेतील, तितक्या ताकदीने महाविकास आघाडी बहुमताच्या दिशेने वाटचाल करेल, त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देणे हे मी माझे कर्तव्य समजतो”, असे पवार यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Nashik News : मिरवणुकीने नवागतांचे शाळेत स्वागत

तर पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले की, “आज तीन पक्षांची प्राथमिक बैठक झाली. ही बैठक विधानसभेची पूर्वतयारीच्या अनुषंगानेच होती. लोकसभेसाठी आम्ही ज्या पद्धतीने लढलो त्यापेक्षा अधिक ताकदीने लोकांचे प्रश्न मांडून विधानसभेमध्ये सुद्धा बदल करू. ही पत्रकार परिषद महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी आहे. लोकशाही वाचवण्यासाठी महाराष्ट्रात जनतेने घवघवीत यश महाविकास आघाडीला मिळवून दिले. अनेक संघटनांनी छोट्या पक्षांनी वातावरण निर्मितीसाठी मदत केल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष करून नमूद केले. तसेच लोकशाही वाचवण्यासाठी जनतेने आम्हाला मत दिल्याचेही त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Nashik News : चार बारचे परवाने महिनाभरासाठी निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

तसेच “प्रचंड धनशक्ती विरोधात ही निवडणूक आम्ही लढवली आणि यश मिळवल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. या निवडणुकीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी सुद्धा एक संदेश दिला आहे. धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न सुद्धा झाला. मात्र, तो या निवडणुकीत यशस्वी झाला नाही. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जवळपास प्रत्येक मतदारसंघांमध्ये प्रचार केल्याचा विशेष उल्लेखही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलतांना केला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या