Friday, November 15, 2024
Homeमुख्य बातम्या...तर मला चांगलं वाटणार आहे का?; संभाजीराजेंचं मराठा युवकांना आवाहन

…तर मला चांगलं वाटणार आहे का?; संभाजीराजेंचं मराठा युवकांना आवाहन

मुंबई | Mumbai

नीट परीक्षेत कमी गुण मिळाले त्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे, पुढे शिक्षणाची वाट कठीण झाल्यामुळे बीड येथील विवेक राहाडे १८ वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. खासदार संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन युवकांनी आत्महत्येचा निर्णय घेऊ नये असे आवाहन केले आहे.

- Advertisement -

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हंटले आहे की, “मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील. आणि मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! हा लढा सुरू असताना, युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही. एक लक्षात ठेवा हा समाज, “लढून मरावं, मरून जगावं” हेच आम्हाला ठावं, असे पोवाडे गाणारा आहे. माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका. आज परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, अंधारात जात असलेली वाटत असली तरी, उद्या नक्की पहाट होईल. सर्व काही ठीक होईल. आपण लढाई जिंकूंच!

माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत.

बीड मधील विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारा सोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.

समाजासाठी बलीदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली..!”

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या