Thursday, May 2, 2024
Homeनगरआम्ही सर्व शांततेच्या मार्गाने तिरंगा रॅली घेऊन मुंबईला जात आहोत - खासदार...

आम्ही सर्व शांततेच्या मार्गाने तिरंगा रॅली घेऊन मुंबईला जात आहोत – खासदार इम्तियाज जलील

देवगड फाटा |वार्ताहर| Devgad Phata

एमआयएमच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला सकाळी 8.45 वाजता अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच पोलिसांनी रोखलं. 15 मिनिटे रॅलीला अडविण्यात आल्यानंतर पोलिसांनी खा. इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा करून रॅलीला पुढे जाऊ दिले.

- Advertisement -

शनिवारी सकाळी 8.30 मिनिटांनी तिरंगा रॅली औरंगाबाद – अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील प्रवरा संगम च्या गोदावरी नदीच्या पुलावर पोहोचली. तेथे मराठा आरक्षणासाठी गोदावरीत बलिदान देणार्‍या काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्यास खा. इम्तियाज जलील यांनी अभिवादन केले. त्यानंतर रॅली पुढे निघाली. यावेळी सुमारे तीनशे वाहनांचा ताफा रॅलीत सामील झाला होता. प्रत्येक वाहनावर तिरंगा लावण्यात आलेला होता. मात्र पूल ओलांडून अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा हद्दीत प्रवेश करताच 8.45 वाजता पोलिसांनी तिरंगा रॅलीला अडवलं.

रॅली पुढे जाऊ शकत नाही असे खा. जलील यांना पोलिसांनी सांगितले. याठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा हजर होता. रस्त्यावर लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले होते. हळूहळू या ठिकाणी कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. खा. जलील आणि एमआयएम कार्यकर्ते यांनी औरंगाबाद – अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या दिला. खा. जलील यांनी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकार्‍यांना रॅलीच्या परवानगी बाबत माहिती दिली. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्याच्या दुसर्‍या बाजूने पोलिसांनी महामार्गावरील इतर वाहतुक खुली करून दिली. सुमारे 5 किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर खा. जलील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांशी फोनवर चर्चा केली. रस्त्यावर इतर वाहतुकीला अडथळे येणार नाही याची काळजी घेऊन रॅलीला पुढे जाऊ देण्यास पोलिसांनी परवानगी दिली. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

खासदार जलील यांनी यावेळी सांगितले की आम्ही आमच्या मागण्या साठी मुबई कडे जात आहे व आम्ही शांतापूर्व मार्गाने जात आहेत त्यामुळे ठिक ठिकाणी आम्हला अडवलं जाऊ नये नगर औरंगाबाद सीमेवर प्रवरा संगम येथे पोलिसांनी सांगितले की जाण्याची परवानगी नाही तर आम्ही सर्व परवानगी घेऊन मुंबईला जात आहे. या प्रसंगी सुदर्शन मुंढे व नेवासा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

रॅली नगर शहराबाहेरुन मार्गस्थ

दरम्यान नगर पोलिसांनी शेंडी बायपास येथूनच एमआयएमच्या रॅलीला शहराबाहेरुन पुण्याच्या दिशेने मार्गस्थ केले. नगर शहरात कोठला परिसरात एमआयएमच्या रॅलीचे स्वागत करण्यात येणार होते मात्र नगर पोलिसांनी शहराच्या बाहेरुनच रॅलीला मार्गस्थ केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या