Tuesday, March 25, 2025
Homeनगर…अन् खा. लंकेंनी थांबविली बनपिंप्री येथील टोल वसुली

…अन् खा. लंकेंनी थांबविली बनपिंप्री येथील टोल वसुली

अहमदनगर । प्रतिनिधी

नगर- सोलापुर महामार्गावरील (Nagar Solapur Highway) बनपिंप्री येथील टोल नाक्यावर करण्यात येणारी टोल वसुली खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी शुक्रवारी थांबविली.

- Advertisement -

या रस्त्याचे काम अपुर्ण असतानाच टोल वसुल करण्यात येत असल्याने खा. लंके यांनी संबंधित कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क करून काम पुर्ण झाल्याशिवाय टोल आकारू नये अशा सुचना दिल्या, त्यानंतर ही वसुली थांबविण्यात आली.

नगर- सोलापुर मार्गाचे काम अद्याप अपुर्ण आहे. काम अपुर्ण असतानाही टोल वसुली करण्यात येत असल्याबाबत खा. लंके यांच्याकडे यापूर्वी काही तक्रारी आल्या होत्या.

हे ही वाचा : ‘त्यांनी’ साडेसात वर्षे फक्त महसूलमंत्री पदाचा उपभोग घेतला

शुक्रवारी सायंकाळी खा. लंके हे नगर- सोलापुर मार्गाने जामखेडकडे जात असताना बनपिंप्री टोलनाक्यावर वाहनांकडून टोल वसुली करण्यात येत होती. त्यांनी तेथील कर्मचार्‍यांना जाब विचाल्यानंतर त्यांनी वरिष्ठांकडे बोट दाखविले.

खा. लंके यांनी संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून काम अपुर्ण असताना टोल वसुली करण्याचे कारण काय असा सवाल लंके यांनी केला. त्यावर अधिकार्‍यांकडे उत्तर नव्हते. काम पुर्ण होईपर्यंत टोल वसुली थांबविण्यात येईल असे अधिकार्‍याने खा. लंके यांनी सांगितले व संबंधित कर्मचार्‍यांना टोल वसुली न करण्याबाबत सुचना दिल्या.

हे ही वाचा : मनाई हुकुम असतानाही प्लॉटवर मारला ताबा; रात्रीतून ठोकले पत्रे

खा. लंके यांनी या प्रश्‍नात लक्ष घालून टोल वसुली थांबविल्याबद्दल या मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांनी लंके यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...