Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक; नांदेडमध्ये खासदारांच्या ताफ्यातील गाड्या फोडल्या

मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक; नांदेडमध्ये खासदारांच्या ताफ्यातील गाड्या फोडल्या

नांदेड | Nanded

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील मराठा समाज (Maratha Arakshan) आक्रमक झाला आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये राजकीय नेते आणि पुढाऱ्यांना मराठा संघटनांकडून गावबंदी करण्यात येत आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. याचा फटका राजकीय नेत्यांना देखील बसताना दिसून येत आहे.

- Advertisement -

गुरवारी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेणाऱ्या गुणरत्ने सदावर्ते यांची गाडी फोडण्यात आली. काल रात्री उशिरा खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar Vehicle Vandalized) यांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड करण्यात आली. नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा (Nanded Kandhar Ambulga) गावातील रात्री उशिरा ही घटना घडली. खासदारांसह त्यांच्या सोबत असलेल्या वाहनांची देखील यावेळी तोडफोड करण्यात आलीय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर; नेमकं कारण काय?

सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. खासदारांच्या सोबत असलेल्या पोलिसांनी तणाव निवळण्यासाठी तातडीने प्रयत्न केले त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र तोडफोडीत तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले.

शरद पवार यांच्यावर नरेंद्र मोदी यांची टीका; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “इतना तो हक बनता है…”

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक गावात नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. आरक्षण घेऊन या, नंतरच प्रवेश मिळेल अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी असतानाही प्रताप पाटील चिखलीकर तिथे गेले. त्यांच्या ताफ्यातील वाहन माघारी फिरत असताना या गाड्या फोडण्यात आल्या.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या