Friday, November 15, 2024
Homeराजकीयभाजपाचे तोंड बंद का ?

भाजपाचे तोंड बंद का ?

मुंबई | Mumbai

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा दिल्याबद्दल राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी समज दिल्यानंतर राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेनेने या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचा दिल्ली दरबारी अपमान होत असताना भाजप आणि संभाजी भिडे यांची तोंड अद्याप बंद का? असा सवाल शिवसेना नेते तथा खा. संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काल बुधवारी राज्यसभेत सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा दिल्या. त्यावर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी समज दिली होती. सभागृहात कोणत्याही घोषणा करायच्या नसतात. तुमचे हे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्यात येत असून यापुढे अशी विधाने सभागृहात करू नका, अशी समज नायडू यांनी उदयनराजे यांना दिली. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला घेरले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे ? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे, असा टोला लगावतानाच संभाजी भिडे यांच्याकडून सांगली, सातारा बंदची अदयाप घोषणाही नाही, अशी टीका खा. राऊत यांनी केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या