Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut : "शिंदेंच्या शिवसेनेतील २० ते २५ आमदारांवर फडणवीसांचे नियंत्रण"; राऊतांचा...

Sanjay Raut : “शिंदेंच्या शिवसेनेतील २० ते २५ आमदारांवर फडणवीसांचे नियंत्रण”; राऊतांचा दावा

मुंबई | Mumbai

मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीचा (Mahayuti) दणदणीत महाविजय झाला. यामध्ये भाजपने (BJP) १३२, शिंदेंच्या शिवसेनेने ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (Ajit Pawar NCP) ४१ जागांवर विजय मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्रीपदावर (CM Post) भाजपने दावा केला. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंना सातत्याने डिवचण्याचे प्रयत्न केले जात आहे. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील आजच्या रोखठोकमधून चिमटे काढण्यात आले आहेत. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना खासदार राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “सामनातील रोखठोक मधील विषय सर्वांनाच माहिती आहे. महायुतीत एकसंघात नाही, एक वाक्यता नाही. एकमेकांविरुद्ध कुरघोड्या करण्याचे प्रयत्न सुरू असून एकनाथ शिंदे यांची कुरघोडी करण्याची ताकद भाजपाने संपवली आहे. भाजपामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांचा गटाचा एक सरपटणारा प्राणी झाला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील असे वचन दिल्यानंतरच ते शिवसेनेतून फुटल्याचे खासगीत सांगतात, असे त्यांनी म्हटले आहे. मी खोटं बोलत नाही, तुम्हाला तसं वाटत असेल तर त्यांना (एकनाथ शिंदे) जाऊन विचारा”, असेही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की,”एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा चेहरा पाहिला असेल, देहबोली पाहिली असेल, ती पहिल्यावर कळेल की, ते शून्यात आहेत, गुंगीत आहेत, ते धक्क्यातून सावरलेले नाही. ५० ते ५५ जागा कशा मिळाल्या हा पहिला धक्का, भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला नाही हा दुसरा धक्का. त्या धक्त्यातून पूर्ण कोलमडलेले आहे. सरकारमध्ये पूर्ण कोंडी झाली आहे. सरकारमध्ये चार-दहा लोकांना मंत्रीपद असणे म्हणजे मान अन् प्रतिष्ठा नाही. जो फोकस मुख्यमंत्री म्हणून होता, तो राहिला नाही. लोक त्यांच्याकडे जात नाहीत. लोक त्यांच्याकडे जातात, फक्त पैसे मागण्यासाठी जातात. यापुढे त्यांचे राजकारण पैसा आणि सत्ता यावरच चालणार आहे”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

तसेच “एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांमध्ये (MLA) चलबिचल सुरू असून त्यांच्यातील एका मोठ्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचे पूर्णपणे नियंत्रण आहे. किमान २० ते २५ आमदारांचा हा गट असून हे लोकं देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले होते, एकनाथ शिंदेंसाठी गेले नव्हते. आजही या आमदारांवर नियंत्रण फडणवीसांचे आहे. तर उरलेल्या आमदारांमध्ये चलबिचल असून भविष्यात त्यांची अधिक कोंडी होईल. आपल्याला नेतृत्व नाही, भाजपकडे गेलो तर संरक्षण मिळेल. त्यामुळे पुन्हा मागे फिरायचे का? असा विचार त्या आमदारांमध्ये सुरू असल्याची माहिती कळते”, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

फडणवीसांनी ‘तो’ धोका ओळखला

भाजपासोबत गेल्याने अजित पवार यांची ‘ईडी’ची (ED) कारवाई टळली. त्यांनी एक हजार कोटींची जप्त केलेली संपत्ती सोडवून घेतली व पुन्हा बोनस’ म्हणून उपमुख्यमंत्रीपद मिळविले. या व्यवहारात अजित पवार खूश आहेत.अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे नाही व मुख्यमंत्री होण्यापेक्षा सुरक्षित बाहेर राहिलेले बरे हे धोरण पवारांनी स्वीकारले आहे. तसेच पुन्हा धनंजय मुंडे यांचाही बचाव होत आहे, पण शिंदे यांचे तसे नाही. ठाकरे मंत्रिमंडळात असतानाही त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते व फडणवीस मंत्रिमंडळात असतानाही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनायचे आहे. त्यामुळे हा धोका फडणवीस यांनी ओळखला आहे, असेही संजय राऊतांचे म्हणणे आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...