Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या“मणिपूरवर देश जागा झालाय, अण्णांनी आता…”; संजय राऊतांचा खोचक टोला

“मणिपूरवर देश जागा झालाय, अण्णांनी आता…”; संजय राऊतांचा खोचक टोला

मुंबई । Mumbai

मणिपूरमध्ये महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट पसरली आहे. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी देखील या घटनेवरून मत व्यक्त करत आवाज उठवला आहे. परंतु या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला आहे. मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देश जागा झाला आहे. पण अण्णांनी महाराष्ट्रातील भ्रष्टाचारावर आणि राजकीय घडामोडींवर आवाज उठवायला हवा होता, असे म्हणत राऊतांनी अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, मणिपूर या विषयावर अख्खा देश रस्त्यावर आहेत. सगळे त्यावर बोलत आहेत. मधल्या काळात अनेक विषय झाले, महिला कुस्ती पटूबाबत विषय आहे ज्यात थेट भाजपाचा संबंध आहे. आम्ही वाट बघत होतो अण्णा हजारे त्यावर बोलतील, भूमिका घेतील. राज्यात सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी मंत्रिमंडळात आहेत. भ्रष्टाचाऱ्यांचा सत्कार पंतप्रधान दिल्लीत करतायेत. महाराष्ट्रात अण्णा हजारेंची ओळख आहे. अण्णा हजारेंची प्रतिमा आहे. दादा भुसे, राहुल कुल, अब्दुल सत्तार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रकरणे मी बाहेर काढली. ते अण्णांच्या डोळ्यासमोर आहे. अण्णा हजारे यांना माझी हात जोडून विनंती आहे. तुम्ही नेहमी देश वाचवण्यासाठी भूमिका घेतली आहे. रामलीला, जंतरमंतर याठिकाणी अण्णा हजारेंनी आंदोलन केले. अण्णांच्या आंदोलनामुळे आज भाजपा सत्तेत आहे आणि काँग्रेस सत्तेतून गेली. आज त्याच भाजपाच्या भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारेंनी रणशिंग फुंकण्याची गरज आहे असं राऊतांनी म्हटलं.

VIDEO : मणिपूर घटनेवर अण्णा हजारे संतापले, मोदी सरकारला फटकारत म्हणाले…

तसेच अण्णा हजारेंना जाग आलीय ही मोठी गोष्ट आहे. देशात भ्रष्टाचार वाढलाय, बलात्कार वाढलेत आम्ही अण्णा हजारेंना म्हटलं अण्णा उठा, रामलीला मैदान, जंतरमंतरला जाऊया. तेव्हा अण्णा कुठे होते? जंतरमंतरवर महिला कुस्तीपटू आंदोलन करत होते तेव्हा अण्णा कुठे होते? मणिपूर हिंसाचारावर आज देश बोलतोय. त्यात अण्णा हजारे बोलले त्यात नवीन काय असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या