Wednesday, January 7, 2026
Homeराजकीय"...तर फडणवीसांना अटक करा"; संजय राऊतांची मागणी

“…तर फडणवीसांना अटक करा”; संजय राऊतांची मागणी

मुंबई | Mumbai

काल आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर पुण्यातील बालेवाडीत भाजपच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची दोन दिवसांची चिंतन बैठक पार पडत आहे. या बैठकीच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन करतांना काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘विरोधकांना उत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा’, असा आदेश कार्यकर्त्यांना दिला होता. यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले. तसेच फडणवीसांना अटक करा अशी मागणीही त्यांनी केली.

- Advertisement -

हे देखील वाचा : शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार – अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

YouTube video player

यावेळी बोलतांना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, ठोकून काढण्याची भाषा करणाऱ्या फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अमित शाह (Amit Shah) यांनीही राजीनामा द्यायला पाहिजे. दोन्ही गृहमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर ठोकशाहीची भाषा काय असते हे आम्ही त्यांना दाखवून देऊ.अमित शाह हे व्यापारी नेता आहेत.ते आपले गृहमंत्री आहे, हे सांगायला लाज वाटते.गुजरातच्या व्यापाऱ्याला आम्ही महाराष्ट्र लूटू देणार नाही, असे राऊत यांनी म्हटले.

हे देखील वाचा : उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी, देवेंद्र फडणवीसांना व्हिलन केलं जातंय – बावनकुळे

तसेच भाजपने (BJP) पैसे देऊन आणि ईडीच्या धमक्या देऊनच आमदार फोडले आहेत. देशाचा गृहमंत्री कसा नसावा, याचे हे उत्तम उदाहरण आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) जे आमदार (MLA) फुटले त्यांना प्रत्येकी ५० कोटी रुपये फडणवीस यांनी दिले. २० आमदार फोडल्याचे फडणवीस गर्वाने सांगत आहे. त्यामुळे त्यांना अटक करा. त्यांच्यावर ईडी-सीबीआयची चौकशी लावा,असेही राऊतांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...