Tuesday, March 25, 2025
Homeनगरचिंता करू नका, महाविकास आघाडी कायम राहील

चिंता करू नका, महाविकास आघाडी कायम राहील

खा. संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई साईचरणी लिन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) श्रद्धा आणि सबूरी आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करु नका महाविकास आघाडी कायम राहील असे प्रतिपादन शिवसेना नेते खा. संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केले. खा. संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई यांनी प्रजासत्ताक दिनी शिर्डीत (Shirdi) येवून साई समाधीच दर्शन (Sai Samadhi Darshan) घेतले. संस्थानच्यावतीने त्याचा शाल, उदी, साईमुर्ती देवून सत्कार करण्यात आला. तर यावेळी बोलताना खा. राऊत म्हणाले, आम्ही श्रद्धा आणि सबूरीन घेत असून महाविकास आघाडी कायम राहील अस स्पष्ट केल.

- Advertisement -

विधानसभा निवडणूकीनंतर साईबाबांच्या शिर्डीत (Shirdi) राजकीय पक्षांनी अधिवेशनाचा सपाटा लावलाय. गेल्या पंधरा दिवासात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिवेशन पार पडले. हे दोन्ही अधिवेशन शनिवार-रविवार झाले. सुट्यांच्या दिवशी राजकीय अदिवेशन झाल्यानं संजय राऊत यांनी यावर आक्षेप घेत विरोधकांचा समाचार घेतला. खा. राऊत म्हणाले, आम्ही श्रद्धा सबूरी मानतो. मात्र राज्यातील जनतेत आता सबूरी राहीली नाही. काही दिवसांपुर्वी येथे अधिवेशन झाले. येथे सातत्यांने राजकीय पक्षांचे अधिवेशन होताय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं झालं, भाजपाच झालं. आता अजून एक अधिवेशन होणार आहे.

सुटीच्या दिवशी शनिवारी-रविवारी पंचवीस-पंचवीस हजार लोक येथे गोळा होतात. याचा भार येथिल भक्तांवर आणि मंदिरावर पडतो. हे कुठं तरी थांबायला हवं. अनेक भक्तांनी माझ्याकडे शिवसेना भवनात येवून तक्रारी केला. पंचवीस तीस हजार लोक तुम्ही शिर्डीत (Shirdi) जमा होतात आणि देशाभरातून येणार्‍या भक्तांवर आक्रमण करतात, गोंधळ घालतात. पंचवीस हजार राजकीय लोकं येथे येतात. मला असं वाटत की येथिल लोकांचा संयम हळूहळू तुटत चालला आहे. ही अधिवेशन नगरी झाली आहे. मला वाटत साईबाबा सगळ्यांनाच आशीर्वाद देत असतीलच अस नाही. त्यांनी आम्हाला सांगीतलय श्रद्धा आणि सबूरी आम्ही श्रद्धा आणि सबूरीनं घेतोय असेही राऊत म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...