नागपूर | Nagpur
मागील दोन आठवड्यांपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter session) सुरु असून विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. त्यातच अधिवेशना दरम्यान शिंदे गटातील (Shinde Group) मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून या आरोपांवरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे…
ते म्हणाले की, भाजप (BJP) आणि शिंदे गट दोघे मिळून सरकार चालवत आहे. पंरतु, भ्रष्टाचाराची (Corruption) प्रकरणे एकाच गटाची निघत आहेत. त्यावरून समजून जा की आम्हाला फायली कोण देत आहे. आम्हाला भाजपचे लोकच फायली पुरवत आहेत, असा मोठा गौप्यस्फोट यावेळी राऊत यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, एकाच पक्षातील कित्येक मंत्र्यांवर टीका होत आहे. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ही सगळी प्रकरणे गंभीर आहेत. काही लोक म्हणत आहेत बॉम्ब कुठे फुटत आहेत. मग हे बॉम्ब नाहीतर काय फुटत आहे. तसेच अलीबाबा ४० चोरांनी केलेले एक एक घोटाळे (Scams) आम्ही बाहेर काढू असेही राऊतांनी यावेळी सांगितले.