Monday, July 8, 2024
Homeमहाराष्ट्रश्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला; म्हणाले,''वरळीत पुन्हा निवडणुकीला उभे राहतात की...

श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला; म्हणाले,”वरळीत पुन्हा निवडणुकीला उभे राहतात की घाबरून…”

मुंबई | Mumbai

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) घवघवीत यश मिळवत महायुतीला (Mahayuti) पराभवाची धूळ चारल्यानंतर आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.त्यामुळे लोकसभेनंतर आता पुन्हा एकदा राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरूवात केली असून विविध मतदारसंघात राजकीय नेत्यांचे दौरे वाढल्याचे चित्र दिसत आहे.

हे देखील वाचा : सांगलीची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काम केले नाही म्हणून हरलो; संजय राऊत यांचा आरोप

अशातच आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांचा वरळी विधानसभा मतदारसंघ निवडणुकीदरम्यान चर्चेत आला असून ‘काही झाले तरी वरळीत कमळ फुलू देणार नाही’, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.यावरून आता शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ” पुढच्या वेळेस वरळीमधून उभे राहतात की नाही? हा एक प्रश्न आहे. की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात हे पाहा” असा खोचक टोला लगावत श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे देखील वाचा : Manoj Jarange : “मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्या”; जरांगेंची सरकारकडे मागणी

तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना काहींनी मतदान केले. त्यामुळे त्यांचा विजय झाला. मात्र ही तात्पुरती गोष्ट असून कामस्वरुपी गोष्ट नाही. लोकांची दिशाभूल करून महाविकास आघाडीने मते मिळवली. लोकांची दिशाभूल एकदा करतील. मात्र, वारंवार लोकांची दिशाभूल करता येत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार महाराष्ट्रात येईल” असेही श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर जळगावात शिक्षकांना पैसे वाटप; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

दरम्यान, वरळीमध्ये (Worli) महाविकास आघाडीला अपेक्षा होती की, ४० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल. परंतु, जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. फक्त ६ हजार मताधिक्य मिळाले. त्यांना वाटत होते की, मराठी माणूस त्यांच्याबरोबर आहे. खऱ्या अर्थाने मराठी माणूस शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने आहे. हे लोकांनी दाखवून दिले. या ठिकाणी १९ टक्के मतदान शिवसेनेला पडायचे त्यापैकी १४ टक्के मतदान हे धनुष्यबाणाला झाले, असे श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.त्यामुळे आता यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रया येत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या