Tuesday, July 23, 2024
Homeराजकीयसांगलीची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काम केले नाही म्हणून हरलो; संजय राऊत...

सांगलीची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काम केले नाही म्हणून हरलो; संजय राऊत यांचा आरोप

नाशिक | Nashik

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) राज्यात विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्व भूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी भाजपसह मविआतील कॉंग्रेस, राष्ट्रवादीवर सांगलीतील पराभवावरून टीकास्त्र सोडले आहे.

येत्या २६ जूनला शिक्षक आणि पदवीधरसाठी मतदान होणार असून १ जुलैला मत मोजणी होणार आहे.यात कोकण आणि मुंबई पदवीधर तर मुंबई व नाशिक शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे.सध्या या निवडणुकीच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असून निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे.

यावेळी बोलतांना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. आमच्या किमान १०० जागा अत्यंत कमी मतांनी गेल्या. गेल्या म्हणजे त्या ओरबाडून नेल्या. त्याचा प्रत्यय आम्हाला मालेगावमध्ये आला.निवडणूक आयोगाचा दबाव त्यात स्पष्ट होत होता. आता तर उद्धव ठाकरे यांनाही आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे केंद्रात सत्तापालट झाल्यानंतर पहिली कारवाई निवडणूक आयोगाच्या तीन अधिकाऱ्यांवर केली जाईल” असा इशारा राऊत यांनी दिला.

तसेच काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी “महाविकास आघाडीत आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे. आम्ही जास्त जागा लढवायला हव्या होत्या, परंतु महाविकास आघाडीत बिघाड होऊ नये, म्हणून आम्ही दोन पावले मागे आलो,असे म्हटले होते. त्यावरही राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “शरद पवार यांचा स्ट्राईक जास्त आहे हे खरे आहे. पण सांगलीच्या जागी काँग्रेसने काम केले नाही. या जागेवर राष्ट्रवादीने काम केले नाही. दुसरीकडे केंद्र सरकारने सगळ्यात जास्त आम्हाला टार्गेट केले. त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवारांना बसला. शरद पवार जास्त जागा म्हणजे सगळ्याच तर घेणार नाहीत ना, त्याबाबत बैठकीत ठरवू” असा उल्लेखही राऊत यांनी केला.अद्याप विधानसभेसाठी मविआची बैठक झाली नसून लवकरच ती होईल असेही संजय राऊत यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या