Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात कोसळलेल्या 'त्या' हेलिकॉप्टरने खासदार सुनील तटकरे करणार होते प्रवास

पुण्यात कोसळलेल्या ‘त्या’ हेलिकॉप्टरने खासदार सुनील तटकरे करणार होते प्रवास

पुणे | Pune

आज बुधवार (दि.०२) रोजी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास पुण्यातील (Pune) बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची (Helicopter Crash) घटना घडली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू (Death) झाला असून यात दोन वैमानिक आणि एक इंजिनिअरचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अशातच आता या हेलिकॉप्टरने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रवास करणार होते, अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Pune Helicopter Crash : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन आज सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास एका हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. यानंतर हे हेलिकॉप्टर मुळशी भागातील डोंगराळ परिसरातून जात होते.मात्र, यावेळी डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर धुक्याची चादर पसरली होती. या धुक्याचा अंदाज न आल्याने हे हेलिकॉप्टर थेट दरीत कोसळले, असा अंदाज वर्तवला जात आहे.हे हेलिकॉप्टर हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे होते.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ऑफिस बॉयनेच दिली मालकाची सुपारी; दरोड्यासाठी केली रेकी

दुर्घटना झालेले हे हेलिकॉप्टर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने जात होते. सुनील तटकरे यांनी मंगळवारी ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या याच हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. विशेष म्हणजे सुनील तटकरे हे काल या हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते आणि त्यानंतर ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते. यानंतर सुनील तटकरे हे हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून मुंबईला रवाना झाले होते.

हे देखील वाचा : Nashik Crime News : तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला

दरम्यान, यानंतर आज सकाळी हे हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना नेण्यासाठी पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, त्यापूर्वीच या हेलिकॉप्टरला अपघात झाला. सुनील तटकरे हे याच हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते. त्यासाठी या हेलिकॉप्टरने ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन उड्डाण केले होते. सकाळी पावणे सातच्या सुमारास या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. मात्र, त्यानंतर काहीवेळातच हे हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरातील दरीत कोसळले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या