Monday, October 14, 2024
Homeक्राईमNashik Crime News : तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला

Nashik Crime News : तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महिनाभरापूर्वी नाशिक शहरात (Nashik City) खुनाच्या (Murder) दोन घटना घडल्या होत्या. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा शहरात तरुणावर टोळक्याने प्राणघातक हल्ला (Attack) केल्याची घटना घडली आहे. यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : मालेगावमध्ये डाळिंब इस्टेट मंजूर; मंत्री दादा भुसेंच्या पाठपुराव्याला यश

याबाबत अधिक माहिती अशी की, आज मंगळवारी (दि.०१) रोजी सकाळी गंगापूर रोडवरील (Gangapur Road) मॅरेथॉन चौकाजवळून आकाश धनवटे नावाचा युवक (Youth) पंडित कॉलनी परिसराकडे जात होता. त्यावेळी संशयित अथर्व दाते याने त्याच्या इतर चार ते पाच साथीदारांसोबत येऊन आकाश धनवटे याच्यावर कोयत्याने (Koita) प्राणघातक हल्ला केला.

हे देखील वाचा : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा ई-शुभारंभ

या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. तसेच हल्ला केल्यानंतर संशयित पसार झाले असून सरकारवाडा पोलिसांचे (Sarkarwada Police) पथक त्यांच्या मागावर आहे. तर संशयित आणि आकाश हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या