Monday, November 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजUdayanRaje Bhosale : अक्षय शिंदे एन्काऊंटरवर खासदार उदयनराजेंची संतापजनक प्रतिक्रिया; म्हणाले, गोळ्या...

UdayanRaje Bhosale : अक्षय शिंदे एन्काऊंटरवर खासदार उदयनराजेंची संतापजनक प्रतिक्रिया; म्हणाले, गोळ्या घालून…

सातारा | Satara
अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरवरून सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षाने धारेवर धरले आहे. शाळा प्रशासनाला पाठिशी घालण्यासाठी एन्काऊंटर घडवून आणला असा गंभीर आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येतोय. तर दुसरीकडे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे. न्याय कोणाकडे मागायचा? लोकप्रतिनिधी, न्यायालय, पोलीस कोणाकडे जायचे? अशी प्रतिक्रिया बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपीच्या एन्काऊंटरवर खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

काय म्हणाले उदयनराजे भोसले?
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. मात्र या प्रकरणातील शाळा चालकांसह अन्य आरोपी फरार किंबहुना मोकाट असताना पोलिसांनी केलेल्या कारवाईवर विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला.

- Advertisement -

हे ही वाचा : Akshay Shinde : ‘आम्ही आमची भूमिका कागदोपत्री मांडणार’; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार

खासदार उदयनराजे म्हणाले, सत्ताधारी विरोधक मला काही घेणदेणे नाही. सत्ताधारी असू दे किंवा विरोधक जे कोणी असू दे यांच्या कुटुंबासोबत हा प्रसंग घडला असता तर काय केले असते? बोलले असते का? अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्या कुटुंबाच्या जागेवर मी स्वत:ला ठेवून मी बोलत असतो. कालची घटना फार सहज झाली. गोळ्या घालून मारण्यापेक्षा त्यांना जनतेत सोडायला पाहिजे होते, तुडवून मारले पाहिजे होते, अशी संतापजनक प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली.

मला आश्चर्य वाटते लोकांना (विरोधकांना) समजत कसे नाही? हेच आपल्या कुटुंबासोबत घडले असते तर प्रतिक्रिा काय असती? आरोपीटे वकीलपत्र स्वीकारले जाते, त्यातून त्याला निर्दोष दाखविण्याचे प्रयत्न केले जातात. लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा, पोलिसांवरचा विश्वास उडत चाललेला आहे. न्याय मिळत नसेल तर लोक काय करणार? असे उदयनराजे म्हणाले.

गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की, त्या काळात जी न्यायव्यवस्था होती त्या प्रकारची न्यायव्यवस्था झाली पाहिजेत. त्यासाठी कायद्यात बदल करा. बलात्कर केला की सरळ लोकांसमोर त्याला फाशी द्या, असे उदयनराजे म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या