Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMPSC Exam 2026: मोठी बातमी! विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षांचे...

MPSC Exam 2026: मोठी बातमी! विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई | Mumbai
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) 2026 मध्ये नियोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये राज्यसेवा, वनसेवा, कृषी सेवा, अभियांत्रिकी सेवा, अन्न आणि औषध प्रशासन सेवा अशा महत्त्वाच्या परीक्षांचा समावेश आहे.

अशा असणार आहे परिक्षांच्या तारखा
आयोगाने जाहिर केलेल्या वेळापत्रकानुसार मुख्य परिक्षा ५ ते ९ मे २०२६ दरम्यान होणार आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आणि कृषी सेवा मुख्य परीक्षा १६ मे २०२६ रोजी होईल. या परीक्षांचे निकाल ऑगस्ट २०२६ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा १७ मे २०२६ रोजी होणार असून, याचा निकाल सप्टेंबर २०२६ मध्ये येईल. तसेच, गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ७ जून २०२६ रोजी होईल त्याचे निकाल सप्टेंबर २०२६ मध्ये होऊ शकता.

- Advertisement -

राज्यसेवा पूर्व परीक्षा ३१ मे २०२६ रोजी आयोजित केली जाईल. राज्यसेवा मुख्य परीक्षा ३ ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधी दरम्यान होणार आहे. यानंतर, विद्युत आणि यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा १५ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहेत. अन्न आणि औषध प्रशासन सेवा आणि निरीक्षक (वैधमापन शास्त्र) मुख्य परीक्षा २१ नोव्हेंबर २०२६ रोजी घेतली जातील.

राज्यसेवा पूर्व परीक्षा ३१ मे २०२६ रोजी आयोजित केली जाईल. राज्यसेवा मुख्य परीक्षा ३ ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार आहे. यानंतर, विद्युत आणि यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा १५ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहेत. अन्न आणि औषध प्रशासन सेवा आणि निरीक्षक (वैधमापन शास्त्र) मुख्य परीक्षा २१ नोव्हेंबर २०२६ रोजी घेतल्या जातील.

MPSC चे वेळापत्रक कसे बघता येणार?
MPSC परीक्षा वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अधिकृत वेबसाइट वर पाहता येते. तुम्ही ‘परीक्षा वेळापत्रक’ किंवा ‘परीक्षा विभाग’ या लिंकवर जाऊन नवीनतम वेळापत्रक तपासू शकता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची...