Wednesday, May 8, 2024
Homeनाशिक'पीएसआय'ची तयारी करताय? शारीरिक चाचणीत झालाय मोठा बदल

‘पीएसआय’ची तयारी करताय? शारीरिक चाचणीत झालाय मोठा बदल

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेनंतरच्या शारीरिक चाचणीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत…

- Advertisement -

यानुसार शारीरिक चाचणीच्या एकूण गुणांपैकी किमान साठ गुण मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरीता किंवा अंतिम निवडीकरीता विचार होणार नाही असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

यासोबतच सर्व शारीरिक चाचणीतील गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येणार आहे.

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणीचे नियम खालीलप्रमाणे करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.

पुरुष उमेदवरांसाठी

गोळा फेक – ७.२६० किलोग्रम कमाल गुण १५

पूलअप्स कमाल गुण = २०

लांब उडी – कमाल गुण = १५

धावणे (८०० मीटर) कमाल गुण = ५०

महिला उमेदवारांसाठी

गोळा फेक – ४ किलो ग्रम कमाल गुण = २०

धावणे (४०० मीटर) कमाल गुण = ५०

लांब उडी – कमाल गुण = ३०

आयोगाने लागून केलेली सुधारणा जी आहे ती २०२० च्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षेपासून लागू होणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे पीएसआयची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शारीरिक चाचणीसाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या