मुंबई / प्रतिनिधी Mumbai
- Advertisement -
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आयोगाचे सदस्य सतीश वाघोले यांच्याकडे देण्याचा निर्णय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतला आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी शुक्रवारी यासंदर्भातील आदेश निर्गमित केला.
एमपीएससीमधील कथित पेपरफुटी प्रकरणी पुण्यात मोठे आंदोलन झाले होते. विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगावरील आरोपांची न्यायालयीन चौकशी जाहीर केल्यानंतर चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय विवेक भीमनवार यांनी घेतला. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी आयोगाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे सोपवला आहे.




