Sunday, May 19, 2024
Homeनगरघोडेगाव मंडळात महावितरणने पकडली 55 लाखांची वीजचोरी

घोडेगाव मंडळात महावितरणने पकडली 55 लाखांची वीजचोरी

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील विज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने घोडेगाव अंतर्गत येणार्‍या चांदा, देवगाव, सोनई, घोडेगाव, वडाळा या पाच कक्षातील मंडळाच्या गावात मागील चार महिन्यात जवळपास 55 लाख रुपयांची (4 लाख युनिट) वीजचोरी पकडली असून तडजोडीपोटी 9 लाखाहून अधिक रक्कम वसूल करण्यात आली तर वीजचोरीच्या अडीचशे केसेस दाखल करण्यात आल्याची माहिती घोडेगाव मंडळाचे उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब बडे यांनी दिली.

- Advertisement -

तीन ते चार महिन्यांपासून विज चोरीची शोध मोहीम सुरू केली घोडेगाव मंडळात सुरु करण्यात आली होती. 3 लाख 96 हजार 644 युनिट ची विज चोरी पकडली. एकूण अडीचशे केसेस यामध्ये दाखल करण्यात आल्या आहेत. विज चोरीच्या युनिट पोटी 54 लाख 85 हजार 600 रकमेची ही विज चोरी झाल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. यामध्ये 9 लाख 17 हजार रुपयांची रक्कम तडजोडी पोटी वसूल करण्यात आली.

विज चोरीविरुद्ध सुरू असलेल्या या मोहीमेचा विज चोरी करणार्‍यांनी मोठा धसका घेतला आहे. ही मोहीम अशीच सुरू ठेवणार असल्याचे घोडेगावचे उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब बडे यांनी सांगितले. यामुळे विज चोरीस मोठा आळा बसणार आहे. या मोहिमेत भाऊसाहेब बडे यांचेसह लक्ष्मी शिंदे, सोनईचे सहाय्यक अभियंता प्रतिक सरोदे, घोडेगावचे विजय खताळ, वडाळ्याचे सहाय्यक अभियंता आनंद किर्पेकर, चांद्याचे सहाय्यक अभियंता राहुल मराठे व देवगावचे सहाय्यक अभियंता आदित्य पिंपळगावकर यांनी सहभाग घेतला.

जास्तीत जास्त ग्राहकांनी अधिकृतरित्या आपली विज जोडणी करून घ्यावी. यापुढे विज चोरी करणार्‍यांची गय केली जाणार नसल्यढाचा इशारा उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब बडे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या