Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMukhyaMantri Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! डिसेंबरचा हफ्ता कधी जमा...

MukhyaMantri Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! डिसेंबरचा हफ्ता कधी जमा होणार? समोर आली मोठी अपडेट

मुंबई | Mumbai
मुख्यंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असे म्हटले होते. त्यानुसार, डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. लाडक्या बहिणींना १५०० रुपयांप्रमाणे सहावा हप्ता मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने महिलांच्या खात्यात २१०० रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान, आता सहावा हप्ता २१०० रुपये येणार की १५०० रुपये येणार या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, जुलै ते नोव्हेंबर पर्यंत १५०० रुपयांप्रमाणे ७५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे २५ लाख महिलांचे अर्ज आले होते. त्या अर्जांची स्क्रुटिनी राहिली असल्याने ती पूर्ण करुन या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...