Friday, May 3, 2024
Homeजळगावजुगार अड्ड्यावर धाड; साडेबारा लाखांचा ऐवज जप्त

जुगार अड्ड्यावर धाड; साडेबारा लाखांचा ऐवज जप्त

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील तालखेडा शिवारातील उमरा फाट्याच्या परिसरातील जुगार अड्ड्यावर धाड टाकली.

- Advertisement -

याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या कारवाईत 12 लाख 41 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले.

संतोष गोपाल जवरे, मंगेश विष्णूनाथ मानकर (रा.पिंपळगाव काळे, ता.जळगाव जामोद, जि.बुलढाणा), गजानन देविदास ढाणे, संदीप सागर पाटील (पारंबी, ता.मुक्ताईनगर), कृष्णा चंद्रकांत बजरे (रा.खेराळा, ता.मुक्ताईनगर), सोपान नारायण खिरळकर (रा.कुर्‍हा, ता.मुक्ताईनगर), सोपान जनार्दन वरगे (रा.लोणवाडी, ता.नांदुरी, जि.बुलढाणा) हे झन्ना, मन्ना नावाचा पत्यांचा जुगार खेळताना व खेळविताना मिळाले.

तर इतर संशयित शेतातील पिकांमधून पसार झाले. पोलिसांनी त्यांच्याकडील 78 हजार रुपये रोख, 72 हजार 500 रुपये किमतीचे 10 मोबाइल, 1 लाख 9 हजार रुपये किमतीच्या 20 मोटारसायकली, कार आणि एक रिक्षा व जुगाराचे साहित्य असा एकूण 12 लाख 41 हजार 400 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेतील हेड कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरुन मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या