Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यामी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही !

मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही !

मुक्ताईनगर – Muktainagar :

मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्यामुळे मला नीटपणे संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही. मी..

- Advertisement -

स्वस्थ बसणाराही नाही. माझ्यावरचे सर्व आरोप खोटे आहेत. मी कोणता उपद्व्याप केलेला नाही. अनेकांवर घोटाळ्यांचे आरोप झालेत सर्वांना क्लीन चिट मिळते.

मग मला का क्लीनचिट मिळत नाही. लवकरच अनेक रहस्यांचा उलगडा होईल, असे स्फोटक मत भाजपचे वरिष्ठ नेते (Eknathrao Khadse)एकनाथराव खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केले.

बाकीच्यांवर कारवाई होत नाही. माझ्यावर का कारवाई करण्यात आली. माझ्यावरचे खोटे आरोप आतापर्यंत सिद्ध करू शकले नाही.

बदनाम करण्यासाठी काही विशिष्ट लोकांनी मीडिया ट्रायल केली होती. जाणीवपूर्वक मला पदावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला.

भ्रष्ट लोकांना पक्षामध्ये घेतले. मात्र ज्यांनी चाळीस वर्ष जिवाचे रान केले त्यांच्या जीवाची कदर नाही का?, असेही खडसे म्हणाले.

मला बदनाम करण्याचे शल्यं माझ्या मनात आहे. नेत्यांच्या प्रवृत्तीमुळे हे सरकार येऊ शकले नाही. ओबीसींवर अन्याय बहुजनांवर अन्याय मग त्या कालखंडात या धोरणामुळे बहुजनांची तिकीटं कापली. ज्यांना तिकीट दिली त्यांना हरवले.

माझे तिकीट कापले, माझ्या मुलीला हरवण्यासाठी प्रयत्न केला. याबाबतचे सर्व पुरावे मी दिले आहेत तरी देखील कारवाई होत नाही?, असे खडसेंनी सांगितले.

मी असा काय गुन्हा केला. जे लोक या विधानसभेत आडवे येत होते त्यांना आडवे करण्याचे काम यात करण्यात आले. मी कधीच पक्षावर टीका केली नाही. आम्ही कष्टाने आणलेले भाजपचं सरकार गेल्याची खंत असल्याचे खडसे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या