Friday, May 3, 2024
Homeराजकीयमुक्ताईनगर : 51 ग्रामपंचायतींसाठी 735 उमेदवार रिंगणात

मुक्ताईनगर : 51 ग्रामपंचायतींसाठी 735 उमेदवार रिंगणात

मुक्ताईनगर – Muktainagar – वार्ताहर :

माघारीच्या दिवशी अकराशे 65 एकूण अर्जापैकी 302 उमेदवारांनी माघार घेतल्याने 735 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

- Advertisement -

मुक्ताईनगर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी 1 हजार 165 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.

त्यापैकी दहा अर्ज अवैध ठरवण्यात आलेले होते. तर माघारीच्या दिवशी 302 उमेदवारी अर्ज माघार घेण्यात आले. त्यातच 118 उमेदवार हे बिनविरोध झाले असून 735 उमेदवार आता निवडणूक रिंगणात आहेत.

बिनविरोध ग्रामपंचायती व त्यातील उमेदवार संख्या खालील प्रमाणे राजुरा 7 ,चिंचोल 9,वायला 5, कार्की 9. याकामी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद बावस्कर राजुरा, ओन्ली धम्मानंद तायडे करकी , सुरेश बारी वायला तसेच अशोक पाटील चिंचोल या गावांसाठी कामकाज पाहिले.

निवडणूक रिंगणात असलेली गावे व तेथील उमेदवार संख्या पुढीलप्रमाणे –

सालबर्डी 19, चांगदेव 27, मेहून 11, मानेगाव 12, कोथळी 21 ,हरताळे 40 ,पिंपरीआक्राउत 16, सातोड 2, घोडसगाव 27, तरोळा 17,निमखेडी खुर्द 17, माळे गाव 14, रुईखेडा 13, काकोडा 18, थेरोळा 9 , पारंबी 16, हिवरा 18, धामणगाव 4 ,बोदवड 18 ,भोता 17,सुळे 18, वडोदा 32, इच्छापुर 14 ,चारठाणे 18,बोरखेडा 17, जोंधन खेळा 15,निमखेडी बुद्रुक 22 ,चिंचखेड बुद्रुक 10,अंतुरली 38, टाकळी 16, पातोंडी 12 ,नरवेल 14 ,धामणदे 11,लोहार खेडा 10 ,खामखेडा 14, पूर्णाड 12, शेमळदे 9 ,मुंधोलादे 5,पांचाने 2, मेळसांगवे 11, पिंपरी पंचम 15, नायगाव 10,नांदवेल 8 ,सुकडी 19, दुई 14, कोर्‍हाला 15 ,पिंप्राळा 18 असे एकूण 735 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या