भेंडा |वार्ताहर| Bhenda
नेवासा (Newasa) तालुक्यातील भेंडा खुर्द येथे मुळा उजव्या कालव्यात (Mula Canal) कचरू आसाराम बेहळे (वय 65) या वृद्ध व्यक्तीचा मृतदेह (Dead Body) सापडला.
- Advertisement -
याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा (Newasa) तालुक्यातील भेंडा खुर्द येथील कचरू आसाराम बेहळे हे वृद्ध सोमवार दि.12 जानेवारी रोजी घरातून बाहेर गेले होते. ते नेहमीच घरी न सांगता पाहण्याकडे जात असत. परंतू दि.17 रोजी सकाळी भेंडा खुर्द (Bhenda Khurd) शिवारातील मुळा उजव्या कालव्याच्या 17 नंबर चारीजवळ पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
नेवासा (Newasa) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह (Dead Body) बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढल्यावर गावातील नागरिकांनी त्यांना ओळखले. शवविच्छेदनानंतर सांयकाळी उशिरा अंत्यविधी करण्यात आला.




