Friday, April 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray: "बाळासाहेबांचे स्वप्न शिवसेनेचा महापौर बसला पाहिजे, पण…", उध्दव ठाकरेंच्या मनात...

Uddhav Thackeray: “बाळासाहेबांचे स्वप्न शिवसेनेचा महापौर बसला पाहिजे, पण…”, उध्दव ठाकरेंच्या मनात नेमकं काय?

मुंबई | Mumbai
राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपला ८९ आणि शिवसेनेला २९ जागा मिळाल्या आहेत. तर ठाकरे बंधुंना ७१ आणि काँग्रेसला २४ जागा मिळाल्या आहेत. महायुतीची संख्या ११८ पर्यंत पोहोचत असल्यामुळे महायुतीचा महापौर बसणार हे नक्की झाले आहे.

भाजपाला महापौर पद मिळवायचे असेल तर शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा लागणार आहे. त्यामुळे महापौर पदावर दावा करणार का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल विचारण्यात आला होता. यावर महायुतीचा महापौर होईल, असे सांगून शिंदेंनी थेट उत्तर देणे टाळले होते. त्यानंतर आज उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महापौर पदाबाबतचे गणीत मांडले.

- Advertisement -

आपला महापौर व्हावा ही देवाची इच्छा असेल तर
मुंबई महापालिकेच्या निकालावर बोलताना आणि मुंबईच्या महापौर पदाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मुंबईमध्ये आमची महापौर होणार आणि व्हावा अशी आमची इच्छा होती आणि आजही आहे. तो आकडा आज तरी आम्ही गाठू शकलेलो नाही. मात्र जो निकाल लागला आहे त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला घाम फोडला आहे. आपला महापौर व्हावा ही देवाची इच्छा असेल तर ते होईल.’ त्याचवेळी मुंबईत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे, हे बाळासाहेबांचे स्वप्न होते, याची आठवणही ठाकरे यांनी करून दिली. एकंदर मुंबईतला ‘गेम’ अजून संपला नसल्याचे सांगत ‘इच्छित’ समीकरणे आकाराला येऊ शकतात, याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले.

उध्दव ठाकरे म्हणाले, जर देवाच्या मनात असेल तर शिवसेनेचा महापौर होईल, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर पडड्याआद काही गोष्टी घडत असल्याचे सूचक संकेत मिळतायेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले नगरसेवक पुन्हा आले तर त्यांना सामावून घ्याल का? असे विचारले असता ‘तुमच्या संपर्कात असतील तर घेऊन या’ असे मिश्किलपणे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray: निकालानंतर उध्दव ठाकरेंची प्रतिक्रिया; “मुंबईमध्ये आमचा महापौर होणार आणि…”

त्यांना भाजपची भीती वाटते, एकदा फुटलेले लोक पुन्हा फुटू शकतात
शिवसेनेचे (शिंदे) निवडून आलेले नगरसेवक ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. याबद्दल उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, त्यांना भाजपाची भीती वाटते. एकदा फुटलेले लोक पुन्हा फुटू शकतात. सर्वच लोक सर्वांच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे जितके नगरसेवक निवडून आले आहेत, त्यातील बरेच आमच्यातील फोडलेले नगरसेवक आहेत. भाजपा महापौर पदासाठी त्यांचे नगरसेवक फोडू शकते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पण बाळासाहेबांचे स्वप्न शिवसेनेचा महापौर बसला पाहिजे हीच होती
आमचा (शिवसेनेचा) महापौर होईल असा आकडा आमच्याकडे सध्या नाहीये. भाजपच्या लेखी आमचा पराजय असला तरी आमच्या पराजयाला तेज आहे, त्यांचा विजय देखील डागाळलेला आहे. ज्यांच्या सहकार्याने ते महापौर बनवणार आहेत आणि जे त्यासाठी सहकार्य करणार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे, आपण हे काय पाप करतोय. कुणी महापौर बसवावा, न बसवावा याची मला चिंता नाही. माझ्यापुढे तो प्रश्न नाही. पण बाळासाहेबांचे स्वप्न शिवसेनेचा महापौर बसला पाहिजे हीच होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बाईला मिश्या असत्या तर…
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे २४ नगरसेवक निवडून आलेले आहेत. काँग्रेसशी आघाडी झाली असती तर लाभ झाला असता का? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, आत्या बाईला मिश्या असत्या तर… अशी मराठीतील म्हण याला लागू होते.”

ताज्या बातम्या

संपादकीय : ३ एप्रिल २०२६ – विनाशकाले ‘ट्रम्प’बुद्धी

0
सत्ता आणि अहंकार जेव्हा डोक्यात जातो, तेव्हा लोकशाहीचा प्रवास हुकूमशाहीकडे व्हायला वेळ लागत नाही. जगाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात मानवजातीने...