Thursday, January 8, 2026
Homeक्राईमCrime News : मुंबईत अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची धारदार शस्राने वार करत...

Crime News : मुंबईत अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची धारदार शस्राने वार करत निर्घूण हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या तालुकाध्यक्षावर हल्ला करण्यात आला आहे. यात तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांचा मृत्यू झाला. भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे त्यांच्यावर काल(शुक्रवारी) धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल रात्री १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर रात्री अज्ञातानी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते, याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा सचिन कुर्मी हे जखमी अवस्थेत सापडले. रात्री हल्ला झाल्यानंतर तत्काळ कुर्मी यांना जेजे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

- Advertisement -

सचिन कुर्मी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र समीर भुजबळ यांचे निकटवर्तीय होते. त्यांच्यावर कोणी हल्ला केला? या हल्ल्याचे कारण काय? याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ हे आज त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

YouTube video player

हा हल्ला कोणत्या कारणावरुन करण्यात आला आहे हे अद्याप समोर आले नसले तरी वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शिवाय, या हत्येमुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. आरोपींना तात्काळ पकडण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

महेश

“तेव्हा मला मुंबईकर म्हणून लाज वाटते…”; महेश मांजरेकरांकडून खंत व्यक्त

0
मुंबई | Mumbaiमुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातले राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची...