Saturday, October 5, 2024
Homeक्रीडाIrani Cup 2024 : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबई संघाने रचला इतिहास; २७...

Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबई संघाने रचला इतिहास; २७ वर्षांनी उंचावला इराणी चषक

मुंबई | Mumbai

अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात मुंबई संघाने तब्बल २७ वर्षांनंतर इराणी चषक (Irani Cup) स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावून इतिहास (History) रचला आहे. मुंबई विरूध्द शेष भारत संघांमध्ये (Mumbai vs Rest India) खेळविण्यात आलेला सामना पाचव्या दिवशी ड्रॉ म्हणून घोषित करण्यात आला. पहिल्या डावात मिळालेल्या महत्वपूर्ण आघाडीमुळे मुंबई संघाला विजयी घोषित करण्यात आले. मुंबई संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ५३७ धावांचा डोंगर उभारला. यात कर्णधार अजिंक्य रहाणे ९७, श्रेयस अय्यर ५७ आणि सर्फराझ खानने ठोकलेल्या शानदार द्विशतकामुळे मुंबई संघाला ही धावसंख्या उभारता आली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Uddhav Thackeray : “आमचे सरकार आल्यानंतर महिनाभरात तुमचा हिशोब…”; उद्धव ठाकरेंचा महायुतीला थेट इशारा

मुंबई संघाच्या (Mumbai Team) धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या शेष भारत संघाने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या. अभिमन्यू ईश्वरन ने १९१ धावा केल्या. तसेच साई सुदर्शन ३२, यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन ३८ धावांचे योगदान दिले.तर ध्रुव जुरेलने ९३ धावा केल्या. मुंबई संघाचा दुसरा डाव घसरत असताना सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) शानदार अर्धशतक झळकावून संघाचा डाव सावरला.परंतु, शेष भारत संघाचा गोलंदाज सारांश जैन मुंबई संघावर अक्षरशः तुटून पडला.त्याने मुंबई अर्धा संघ तंबूत पाठवला.मात्र, पहिल्या डावात शतक ठोकणाऱ्या तनुष कोटियनने आणि मोहित अवस्थीच्या अर्धशतकामुळे मुंबई संघाने विजेतेपद पटकावले.

हे देखील वाचा : Rahul Gandhi : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं संविधान…”; राहुल गांधींचा कोल्हापूरातून मोदींवर निशाणा

मुंबई संघाच्या दुसऱ्या डावात पृथ्वी शॉने एक बाजू लावून धरली. पण दुसऱ्या बाजूने मुंबई संघाचे सर्व फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. आयुष म्हात्रे १४, अजिंक्य रहाणे ९ पहिल्या डावात द्विशतक ठोकणारा सर्फराझ फार काळ टिकू शकला नाही. परंतु, आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तनुष कोटियनने संघाची गाडी पुन्हा एकदा रुळावर आणली. मुंबई संघ दुसऱ्या डावात २०० धावांत तंबूत परतेल असे वाटत असतानाच तनुष कोटियन आणि मोहित अवस्थी यांनी १४८ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे मुंबई संघाला ३०० धावांचा टप्पा पार करता आला.तनुष कोरियन ने ११४ तसेच मोहितने ५१ धावा केल्या.तर पहिल्या डावात शानदार द्विशतक ठोकणारा सर्फराझ खान सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या