मुंबई | Mumbai
विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने मुंबईला जोरदार तडाखा दिला. मागील तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, सोमवारीही पावसाचा जोर कायम आहे. याचा थेट फटका वाहतुकीवर झाला आहे. लोकल ट्रेन, रस्ते वाहतुकीबरोबरच हवाई वाहतुकीतही अडथळे निर्माण झाले आहे. सकाळपासून नऊ विमानांचे लँडिंग रद्द करण्यात आले आहे. तर काही विमानांना गो-अराऊंड करण्यात आले आहे. तर खराब हवामानामुळे एक विमानाला दुसरीकडे वळविण्यात आले आहे.
विमान कंपन्यांकडून प्रवाशांना सुचना
मुंबईतून विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी आता महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. प्रवाशांना विमानतळावर पोहोचण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यास विमान कंपन्यांना सांगण्यात आले आहे. प्रवाशांनी त्यांच्या विमान कंपनीकडे विमानाची सद्यस्थिती तपासावी आणि त्याप्रमाणे विमानतळावर पोहोचावे, असेही सांगण्यात आले आहे.
विमानतळाकडे येणाऱ्या रस्त्यांवर पाणी भरले गेले असून, वाहतूक मंदावली आहे. विमान प्रवास करणार असाल, तर लवकर निघा आणि तुमच्या विमानाचे अपडेट जाणून घेत रहा. विमानतळावर आमच्या टीम तुमच्या मदतीसाठी तयार आहेत, असे आवाहन कंपन्यांकडून करण्यात आले आहे.
गो अराऊंड मेसेज म्हणजे काय?
Go Around हा एव्हिएशनमधला एक तांत्रिक शब्द आहे. विमान धावपट्टीवर लँडिंगसाठी खाली येत असताना काही कारणामुळे (जसे की, हवामान खराब होणे, धावपट्टीवर अडथळा असणे, योग्य अलाइनमेंट नसणे) पायलट लँडिंग न करता विमान पुन्हा हवेत नेतो आणि दुसऱ्या प्रयत्नात लँडिंगचा पुन्हा प्रयत्न करतो.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




