Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSachin Waze : १०० कोटी खंडणी वसुली प्रकरणात सचिन वाझेला उच्च न्यायालयाकडून...

Sachin Waze : १०० कोटी खंडणी वसुली प्रकरणात सचिन वाझेला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई | Mumbai

महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aaghadi Government) काळात शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि इतरांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून तुरूंगात असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन मंजूर झाला आहे. देशमुख यांच्यासह अन्य आरोपी जामिनावर बाहेर आहेत, त्यामुळे सचिन वाझे (Sachin Waze) यांनीही जामिनासाठी याचिका केली होती.

- Advertisement -

हे देखील वाचा : Political Special : नांदगावमध्ये चौरंगी लढत?

राज्याचे माजी पोलिस महासंचालक परमबीर सिंग (Parambir Singh) आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावेळी सचिन वाझेविरोधात १०० कोटी वसुली प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.त्यानंतर वाझे यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्या.भारती डांगरे यांच्या खंडपीठाने २३ ऑगस्टला निकाल राखून ठेवला होता. यानंतर आज त्यावर सुनावणी झाली असता वाझे यांना जामीन मंजूर करण्यात आला.

हे देखील वाचा : नाशिक जिल्ह्यात भाजपला मोठे भगदाड; नगरपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह १५ नगरसेवकांचे राजीनामे

दरम्यान, सचिन वाझे यांच्यावर उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याचा आणि धमकीचा आरोप आहे. तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात ते आरोपी आहेत. गेल्यावर्षी वाझे यांना खंडणीच्या गुन्ह्यात विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन दिला होता. परंतु, इतर दोन गुन्ह्यांत आरोपी असल्याने त्यांचा तुरुंगवास लांबला होता. यानंतर मे महिन्यांत त्यांनी पुन्हा अर्ज करून जामीनाची मागणी केली होती. परंतु, तेव्हाही त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच वाझेला जामीन मंजूर झाल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : नाशकात भाजपला मोठा धक्का! माजी सभापती शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

तरीही तुरुंगातच राहावं लागणार

१०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात सचिन वाझेला जामीन मिळाला असला तरी त्याच्यावर अँटेलिया स्फोटक प्रकरणात गंभीर आरोप आहेत. याप्रकरणातही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल असून एनआयएकडून तपास सुरू आहे. त्यामुळे १०० कोटी वसुली प्रकरणात जामीन मिळाला असला तरी सचिन वाझे याला तुरुंगातच राहावं लागणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या