Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMumbai-Howrah Mail Bomb Threat : मुंबई-हावडा मेलला टायमर बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Mumbai-Howrah Mail Bomb Threat : मुंबई-हावडा मेलला टायमर बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबई । Mumbai

मुंबई हावडा मेलला नाशिकच्या आधी बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी रेल्वे विभागाला मिळाली आहे. ट्वीटरवरुन ही धमकी देण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

दरम्यान मुंबई हावडा मेल जळगाव रेल्वे स्थानकावर सोमवारी पहाटे ४. १५ मिनिटाला गाडी येतात रेल्वे पोलीस, जळगाव पोलीस दल व बॉम्ब शोधक पथक तसेच रेल्वे कर्मचारी यांच्याकडून गाडीची संपूर्ण तपासणी करण्यात आली. तपासणी कोणत्याही प्रकारची संशयित वस्तू आढळून आल्यामुळे गाडी पुढे रवाना करण्यात आली.

मुंबई हावरा मेलमध्ये बॉम्ब असल्याची ट्विटरवरून धमकी देण्यात आली होती. मुंबईकडे जाणाऱ्या १२८०९ हावडा – मुंबई मेल या रेल्वे गाडीमध्ये टायमर बॉम्ब ठेवला आहे, अशी धमकी रेल्वे विभागाला ट्वीटवर देण्यात आली. मुंबई हावडा मेल गाडीत नाशिकच्या आधी मोठा बॉम्बस्फोट करण्याची धमकी यामध्ये देण्यात आली.

धमकीनंतर जळगाव रेल्वे सुरक्षा बल व बॉम्बशोधक पथकाकडून जळगाव रेल्वे स्थानकावर मुंबई हावडा रेल्वे गाडी थांबवून तपासणी करण्यात आली. पहाटे ४:१५ मिनिटांनी जळगाव रेल्वे स्थानकावर १२८०९ हावडा – मुंबई मेल ही गाडी थांबवून रेल्वे सुरक्षा बल व बॉम्ब शोधक पथकाकडून गाडीतील प्रत्येक डब्बाची तपासणी करण्यात आली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...