तिरुअनंतपुरम : भारत आणि विंडीज या दोन संघांमध्ये सध्या ३ टी २० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी विज़यी आघाडी संपादन केली असून आता तिरुअनंतपुरम येथे रविवारी ८ डिसेंबरला मालिकेतील दुसरा निर्णायक सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकून मालिका विजयासाठी भारत सज्ज आहे.
या मैदानाचे संपूर्ण नाव ग्रीनफिल्ड आतंरराष्ट्रीय मैदान असे आहे. या मैदानावर एकूण ५० हजार प्रेक्षक बसू शकतात. या मैदानावरील सर्वाधिक धावसंख्या ६७-५ भारत विरुद्ध न्यूझीलंड ७ नोव्हेंबर २०१७ निसटता विजय भारत ६ धावांनी विरुद्ध न्यूझीलंड ७ नोव्हेंबर २०१७ सर्वाधिक धावा करणारा फलंदाज डी ग्रँडहोम १ सामना १७ धावा २ षटकार फलंदाजीतील सर्वाधिक सरासरी १७ मनीष पांडे सर्वाधिक बळी जसप्रीत बुमरा १ सामना २ षटके ९ धावा २ विकेट्स बेस्ट बॉलिंग फिगर्स २ विकेट्स ९ धावा जसप्रीत बुमरा सर्वाधिक झेल मिचेल संटनेर २ झेल
भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार लोकेश राहुल , रोहित शर्मा , विराट कोहली ,श्रेयस अय्यर , मनीष पांडे , संजू सॅमसन , रिषभ पंत यांच्यावर आहे अष्टपैलूंमध्ये रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे यांच्यावर आहे. गोलंदाजीत मोहंमद शमी, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर कुलदीप यादव युझवेन्द्र चहल यांच्यावर आहे.
विंडीज संघाच्या फलंदाजीची मदार इविन लुईस शिमॉन हेटमायर , लिंडल सिमेन्स , दिनेश रामदिन , निकोलस पुरण ब्रेंडन किंग यांच्यावर आहे अष्टपैलूंमध्ये जेसन होल्डर किरॉन पोलार्ड , फेबिअन अलेन किमो पॉल गोलंदाजीत खारी पीर, शेफने रुदरफोर्ड हेडन वॉल्श , शेल्डन कोटरेल जेसन होल्डर आहेत.
सलिल परांजपे, देशदूत नाशिक