Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाIPL 2022, MI vs KKR : मुंबई इंडियन्स विजयाचे खाते उघडणार?

IPL 2022, MI vs KKR : मुंबई इंडियन्स विजयाचे खाते उघडणार?

पुणे | Pune

आयपीएलमध्ये (IPL) आज १४ वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघांमध्ये सायंकाळी ७:३० वाजता पुण्याचा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावर खेळवण्यात येणार आहे…

- Advertisement -

विशेष म्हणजे मुंबई (MI) आणि कोलकाता (KKR) प्रथमच पुण्याच्या मैदानावर एकमेकांसमोर उतरतील. यंदाच्या हंगामातील केकेआरचा ४ था सामना असणार आहे. तर मुंबई इंडियन्स संघासाठी पराभवाची हॅट्रिक टाळण्याचे आव्हान असणार आहे.

मागील ३ सामन्यांमध्ये अष्टपैलू व्यंकटेश अय्यर (venkatesh iyer) आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरतोय. तसेच मधल्या फळीतील फलंदाज सॅम बिलींग्ज, कर्णधार श्रेयस अय्यर, नितीश राणा यांना अधिक जवाबदारीने आपला खेळ करावा लागणार आहे.

पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात अष्टपैलू आंद्रे रसेलने आपल्या फलंदाजीतून चौकार आणि षटकाराची चौफेर आतषबाजी करून पंजाबच्या हातातोंडाशी असलेल्या विजयाचा घास क्षणार्धात हिसकावून घेत कोलकाताला दणदणीत विजय मिळवून दिला होता.

उमेश यादव (Umesh Yadav) आणि टीम साऊदी (Tim Southee) यांनी मागील ३ सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तर संघासाठी चिंतेची बाब म्हणजे शिवम मावी, वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण कडून संघाला चांगली कामगिरी अपेक्षित असणार आहे.

मुंबई संघाने (MI) आपल्या मागील दोन्ही सामन्यांमध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली. मात्र गोलंदाज आपल्या गोलंदाजीतून फारशी चमक दाखवू शकलेले नाहीत. मात्र सलामीवीर ईशान किशन (Ishan Kishan) चांगलाच फॉर्मात आहे. त्याने मागील २ सामन्यांमध्ये शानदार अर्धशतक ठोकले आहे.

अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) अनुपस्थितीत संघाची मधली फळी ढेपाळली. संघाला मधली फळी सुधारावी लागणार आहे. शिवाय जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहकडून (jasprit bumrah) संघाला चांगली कामगिरी अपेक्षित आहे.

आतापर्यंत मुंबई विरुद्ध कोलकाताचे २९ सामने रंगले आहे. यात मुंबई २२ सामने विजयी झाले आहेत. तर कोलकाता ७ सामने जिंकले आहेत. गत ५ सामन्यांमध्ये मुंबई ४ सामने जिंकले असून कोलकाताने १ सामन्यात विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात पोलार्ड, बुमराह, रसेल यांच्यावर खास यांच्यावर लक्ष असेल.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या