Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray: "कोण कुठून येतेय, काय करतेय, 'बाहेरून येणाऱ्या लोंढ्यामुळे..."; मुंबई लोकल...

Raj Thackeray: “कोण कुठून येतेय, काय करतेय, ‘बाहेरून येणाऱ्या लोंढ्यामुळे…”; मुंबई लोकल अपघातावर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai
मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान आज सकाळी लोकल अपघाताची भयंकर घटना घडली. या अपघातामध्ये ४ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. या अपघातानंतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. आपल्या देशात माणसाची किंमत नाही. मुंबईतील गर्दी नवी नाही, ‘बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे राज्यात बोजवारा उडाला आहे. कोण कुठून येतेय, काय करतेय हे पाहावे लागेल. अपघात होत नाही असा एकही दिवस नाही.’, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलेय.

काय म्हणाले राज ठाकरे?
लहानपणापासून मुंबईकर असलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया देताना तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा कशाला मागता, रेल्वेमंत्र्यांना तिथं जाऊन परिस्थिती बघू द्या, असेही राज यांनी म्हटले.

- Advertisement -

मुंबईतील रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी आहे. या देशात माणसांची किंमत नाही. मुंबईतील रेल्वे कशी चालते हेच जगाला आश्चर्य आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. तर, मुंबईत नीट रस्ते नाहीत, पार्कींग व्यवस्था नाही. केवळ रेल्वेपुरता हा विषय नसून शहरांचा विचका झाला आहे, अशा शब्दात राज यांनी रेल्वे अपघातावर आपले मत मांडले. मुंबईसह मेट्रो शहरात उंच इमारती उभ्या राहत आहेत, रस्ते नाहीत, लोकं वाढल्याने पार्किंगची व्यवस्था नाही. आग लागली तर बंब जायला वेळ नाही, बाहेरून येणारे लोंढे आहेत. कोण येतंय, कोण जातंय हे कळत नाही. मुंबईत मोनोरेल, मेट्रो आहे. कोण काय वापरताय हे कोणी बघत नाही. शहर म्हणून कोणी बघायला नाही. त्यामुळे, केंद्र सरकारने रेल्वेच्या स्थितीकडे लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

YouTube video player

राज ठाकरे म्हणाले, ‘बाहेरून येणाऱ्या लोंढ्यामुळे राज्यात बोजवारा उडाला आहे. आपघात होत नाही, असा एक दिवस जात नाही. विषय रेल्वे पुरता नाही, शहराचा विचका उडाला आहे. मेट्रो आणि मोनो रेल्वेने समस्या सुटणार नाहीत. शहराच्या समस्येकडे कुणीही पाहत नाही. मुंबईतील गर्दी नवीन नाही. रेल्वे मंत्री काय करतात? त्यांनी संध्याकाळी रेल्वेचे फलाट पाहून प्रवास करून दाखवावा.’

त्यापेक्षा त्यांनी जाऊन स्थिती बघावी
मी रेल्वेने प्रवास केला आहे, त्यामुळे मला प्रवास माहीत आहे. कारण, त्यावेळी गर्दी कमी असायची. आता, मुंबईत संध्याकाळी मेट्रोत शिरून दाखवा, आज ज्या कर्व्हवर अपघात झालाय तो काय नवा नाही. रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे, त्यापेक्षा त्यांनी जाऊन स्थिती बघावी, असेही राज यांनी म्हटले. तर, रेल्वेनं लोकलचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यावरही वास्तववादी प्रतिक्रिया दिली. लोकलचे डोर क्लोज केले तर लोकं गुदमरून मरतील, अशा शब्दात राज ठाकरेंनी मुंबईतील वाढती गर्दी आणि रेल्वे प्रशासनावर परखडपणे भाष्य केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...