Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबईत लोकलचा डबा घसरला; वाहतूक विस्कळीत

मुंबईत लोकलचा डबा घसरला; वाहतूक विस्कळीत

मुंबई । Mumbai

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) येथे प्लॅटफॉर्म नंबर एक (Platform One) वर लोकलचा डबा रुळावरुन खाली घसरल्याने हार्बरची रेल्वे (Harbor Railway) सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या रेल्वेरुळावरील वाहतूक बंद ठेवली आहे…

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलकडे (Panvel) मार्गस्थ होणाऱ्या लोकलबाबत हा प्रकार घडला आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक ही काही काळापर्यंत ठप्प राहणार आहे. तर सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने प्रवाशांचा (passengers) खोळंबा झाला आहे.

दरम्यान, रेल्वेचा शेवटचा डबा डेड एंडला धडकल्याने हा अपघात झाला असून या मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सध्या प्लॅटफॉर्म दोनवरुन (Platform two) गाड्या चालविण्यात येत असून या गाड्या विलंबाने धावत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या