मुंबई : भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांनी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. विधानसभा अधिवेशनला सुरुवात झाली असून हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी नाना पटोले यांचे विधानसभा अध्यक्ष म्हणून नाव घोषित केले.
दरम्यान विधानसभा विशेष अधिवेशनला सुरुवात झाली असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पासून अन्य नेत्यांनी भाषणाला सुरुवात केली आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष म्ह्णून नाना पटोले यांची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून किशोर कथोरे यांनी अर्ज मागे घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांचे संपुर्ण सभागृहाच्या वतीने अभिनंदन केले.
विधानसभा अध्यक्षपदांच्या बिनविरोध निवडीनंतर आता विधानसभेच्या कामकाजात मोठा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार विरोधी पक्षनेतेपदाची निवड आजच होणार असे सांगण्यात आले आहे. यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच विरोधी पक्षनेते होतील असे सांगण्यात येत आहे.