Friday, November 22, 2024
Homeदेश विदेशMumbai-New York Flight Bomb Threat : एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी;...

Mumbai-New York Flight Bomb Threat : एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; विमानाचं दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँण्डिंग

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
एअर इंडियाच्या न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती. हजारो फुटांवर असलेले विमान वाटेतूनच दिल्ली विमानतळाकडे वळविण्यात आले. विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आले असून सर्व प्रवासी सुखरुप आहेत. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर बचाव पथकाने विमानाची झाडाझडती घेतली, मात्र कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळली नसून सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे हे विमान मुंबईहून न्यूयॉर्कला जाण्यासाठी निघाले होते. विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळताच हे विमान दिल्लीच्या IGI विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमान सध्या दिल्ली विमानतळावर आहे आणि विमानातील प्रवासी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन केले जात आहे.

- Advertisement -

यापूर्वीही मुंबईहून उड्डाण केलेल्या विमानाच्या टॉयलेटमध्ये या विमानात बॉ़म्ब असल्याची चिठ्ठी सापडली होती. या विमानात १३५ प्रवासी होते. पायलटने ही बाब एटीसीला सांगितली व थिरुवनंतपुरम विमानतळावर आपत्कालीन स्थितीची घोषणा करण्यात आली होती.

एअर इंडियाकडून निवेदन जारी
एअर इंडियाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ’14 ऑक्टोबर रोजी मुंबईहून JFK ला उड्डाण करणारे विमान AI119 ला विशेष सुरक्षा इशारा मिळाला आणि सरकारच्या सुरक्षा नियामक समितीच्या सूचनेनुसार ते दिल्लीकडे वळवण्यात आले. सर्व प्रवासी उतरले आहेत आणि दिल्ली विमानतळ टर्मिनलवर आहेत. या अनपेक्षित व्यत्ययामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय कमी करण्यासाठी मैदानावरील आमचे सहकारी प्रयत्न करत आहेत. एअर इंडिया आपल्या प्रवासी आणि चालक दलाच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे आणि त्याला सर्वोच्च प्राधान्य देते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या