Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपासपोर्ट व्हेरिफिकशनसाठी पोलिस स्टेशनच्या चकरा मारुन थकला आहात?, मग ही बातमी वाचा

पासपोर्ट व्हेरिफिकशनसाठी पोलिस स्टेशनच्या चकरा मारुन थकला आहात?, मग ही बातमी वाचा

मुंबई | Mumbai

पासपोर्ट व्हेरिफिकशनसाठी (Passport Verification) पोलिस ठाण्याच्या (Police station) चकरा मारुन तुम्ही थकला आहात का? तर मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. (mumbai police news)

- Advertisement -

पासपोर्ट व्हेरिफिकेशनबाबत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एक मोठा निर्णय घेतला असून, आता पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी मुंबईकरांना पोलिस स्थानकात बोलवण्यात येणार नाही. केवळ काही अत्यावश्यक कारणाने किंवा काही अपवादात्मक घटनांमध्येच नागरिकांना पोलिस स्टेशनला यावं लागणार आहे, अशी माहिती नवनिर्वाचीत पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी आज ट्विटरवरुन दिली. मुंबईकरांनी देखील या निर्णयाचं स्वागत केल्याचं दिसून येत आहे.

पासपोर्ट व्हेरिफिकेशन ही प्रत्येक अर्जदारासाठी खूप वेळखाऊ प्रक्रीया मानली जाते. अनेकदा या व्हेरिफीकेशनसाठी अर्जदारांना पोलीस स्टेशनमध्ये लाईन लावावी लागते. ज्यातून भ्रष्टाचार आणि लाचखोरीची काही प्रकरणं समोर येतात. याला आळा घालण्यासाठी नवनिर्वाचीत पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याचं कळतंय.

दरम्यान मुंबई पोलीस (Mumbai Police) दलाचे आयुक्त पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर संजय पांडे यांनी मुंबईकरांना दिलासा देणारे निर्णय सुरु केले आहेत. संजय पांडे यांनी मुंबई पोलिसांचा कारभार जनताभिमुख करण्याचा प्रयत्न केलाय. मुंबई पोलिसांकडून नो पार्किंगमध्ये लावली जाणारी वाहनं क्रेनद्वारे न उचलण्याचा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आला होता. यानंतर आणखी एक महत्त्वाचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या