Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMumbai Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर २४ तासांपासून वाहतूक कोंडी; प्रवाशांचे...

Mumbai Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर २४ तासांपासून वाहतूक कोंडी; प्रवाशांचे अतोनात हाल, प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोल आकारू नये, तशा सूचना देऊ, राज्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई | Mumbai
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मंगळवारी घाटात टँकर उलटल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबली आहे.. जवळपास २४ तास झाले तरीही अद्याप मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी सुटली नाही. हा द्रुतगती महामार्ग सहसा मुंबई आणि पुणे दरम्यानचा सर्वात जलद आणि सोपा मार्ग मानला जातो, परंतु एका अपघातामुळे २४ तासांहून अधिक काळ तो पूर्णपणे बंद राहिला. खंडाळा घाट विभागातील आडोशी बोगद्याजवळ एक टँकर उलटल्यानंतर परिस्थिती झपाट्याने बिघडली.

मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास प्रोपेलीन गॅस वाहून नेणारा टँकर उतारावर नियंत्रण गमावून रस्त्यावर उलटल्याने अपघात झाला. टँकर उलटताच त्यातून गॅस गळती व्हायला लागली. प्रोपेलीन गॅस अत्यंत ज्वलनशील असतो आणि लहानशी ठिणगी देखील मोठा स्फोट घडवू शकते. यामुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या चालकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि प्रशासनाला तातडीने कारवाई करण्यास भाग पाडले.

- Advertisement -

या अपघातानंतर मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक २४ तासानंतरही खोळंबली आहे. या वाहतुक कोंडीमुळे अनेक प्रवासी बेहाल झाले आहेत.या वाहतुक कोंडीमुळे प्रवाशांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. काही प्रवासी वाहने मुंबईच्या दिशेने येत आहेत त्यांनाही कोंडीचा सामना करावा लागत आहे. सकाळी ७ वाजता एक टेम्पो चालक या कोंडीत फसला. त्याने प्रशासनावर आरोप करत कुणीही वाहतूक कोंडीची पूर्वकल्पना दिली नसल्याचा आरोप केला. खंडाळा घाटातील बोगद्याजवळ हा गॅस टँकर पलटी झाला. त्यातून होणाऱ्या गॅस गळतीमुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

YouTube video player

या हायवेवर टँकर पलटी झाला असतानाही या ठिकाणी आरआरबीचे कोणतेही अधिकारी किंवा प्रशासनाचे कोणतेही अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे जुन्या महामार्गावरुन मोठ्या संख्येने प्रवासी निघाल्याने खोपोलीजवळ वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. महत्त्वाचे म्हणजे या महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याची सूचना प्रशासनाने दिली नाही. त्यामुळेच अनेक प्रवाशांवर या ठिकाणी गेल्या २४ तासांपासून वाहतुककोंडीमध्ये अडकण्याची नामुष्की आल्याचे दिसून आले. यामुळेच प्रवाशांनी त्यांचा संताप व्यक्त केला.

SIR: “निवडणूक आयोग हे व्हॉट्सॲप आयोगासारखे, फक्त नावे हटवण्यासाठी…”, ममता बॅनर्जींचा निवडणुक आयोगावर आरोप

एक्स्प्रेसवे वर टोल आकारु नये
केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या 24 तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. अशाही स्थितीत प्रवाशांकडून टोल वसुली केली जात असल्याने लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यावर टोल वसुली न करण्याच्या सूचना देऊ असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले.

इंद्रनील नाईक म्हणाले की, “तूर्तास हा मार्ग मोकळा करण्यासाठी प्राथमिकता आहे. ही घटना आज घडली आहे ती चुकीची असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढणार आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यावरही भर देणार आहोत. याबाबत पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणे झाले आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या वाहतूक कोंडीनंतर त्या ठिकाणी टोल वसुली न करण्याच्या सूचना आम्ही देऊ.”

दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली होती. तेव्हापासून पहाटे ४ वाजेपर्यंत टँकरमधील गॅस गळती थांबवण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र त्याला यश आले नाही. त्यानंतर सकाळी पुन्हा नव्याने प्रयत्न सुरू झाले. मात्र या प्रयत्नाला यश कधी मिळेल हे सांगणे कठीण आहे. ज्या यंत्रणा आहेत त्यांनाही कोंडीमुळे घटनास्थळी पोहचणे कठीण होत आहे. एनडीआरएफ टीम इथे पोहचलीय, टाटाची टीम आहे. केमिकल तज्ज्ञ इथे पोहचले अशी माहिती मिळत आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : कांदा बाजारभावात घसरण; संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

0
येवला | प्रतिनिधी | Yeola कांदा बाजारभावात (Onion Rate) घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज, बुधवारी, (दि. ४) सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास 'जय जवान...