मुंबई | Mumbai
आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Ekadashi) देशभरातून अनेक वारकरी पंढरपुरात पोहचू लागले आहेत. त्यामुळे सध्या पंढरपूर (Pandharpur) वारकऱ्यांनी फुलून गेले आहे. एकीकडे आषाढी एकादशीनिमित्त आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai Pune Expressway Highway) आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने झडप घातली.
मुंबईहून पु्ण्याकडे निघालेल्या खासगी बसचा (Bus Accient) पनवेलजवळ सोमवारी रात्री भीषण अपघात (Terrible Accident) झाला. बससमोर अचानक ट्रॅक्टर आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बस ट्रॅक्टरला धडकून २० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ४२ जण जखमी झाले आहेत. (Mumbai-Pune Expressway Bus Accident on Varkari news in Marathi)
हे देखील वाचा : पावसात फिरायला गेले आणि अडकले; अंजनेरी गडावरचा रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक Video आला समोर
जखमींना एमजीएम रूग्णालयात (MGM hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील सात ते आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अपघातग्रस्त वाहनातील सर्व प्रवासी हे डोंबिवली, नीलजे लोढा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली असून, घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा