बरेच दिवसाच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाचा जोर शुक्रवारी दिसून आला. शहरात पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले. दादर, माटुंगा, वरळी, लालबाग, सायन, कुर्ला, अंधेरीसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे हिंदमाता, अंधेरी, कुर्ला, सायन यासह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत येत्या काही तासात अजून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.