Thursday, May 9, 2024
Homeजळगावभुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात

भुसावळ : 15 वाहनांमधून झारखंड जाणारे 60 प्रवासी ताब्यात

बाजारपेठ पोलिसांची कारवाई : वैद्यकिय पथकाकडून तपासणी

भुसावळ  – 

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे. तर उद्योगधंदे बंद झाल्याने अनेकांचा रोजगार गेला आहे. यामुळे खाण्या पिण्याची परवड होत असल्याने झारखंड राज्यातील जवळपास 60 नागरिकांची चौकशी केली. त्यांच्याकडील वाहतुकीची कुठलीही परवानगी नसल्याने या नागरिकांना येथील हॉटेल सुहास जवळ थांबवून त्यांची वैद्यकिय पथकाकडून तपासणी करण्यात आली. ही घटना दि. 28 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली.

देशभरात लॉकडाऊन सुरु असतांना राज्यातील बहुतांश रोजगार बंद झाला आहे. तसेच वाहन व्यवसाय ही ठप्प झाला असल्यामुळे परप्रांतीय नागरिकांच्या खाण्या पिण्याची परवड होत असल्याने झारखंड राज्यातील 60 बेरोजगार व वाहनचालक आपल्या मुळगावी रवाना झाले.

मुंबई ते भुसावळ दरम्यानचा त्यांचा प्रवास सुरळीत झाला. मात्र भुसावळ येथे गस्तीवर असलेल्या एपीआय अनिल मोरे यांच्या पथकाने एमएच 02 (मुंबई) पासिंगच्या काली-पिली गाड्यांसह अन्य वाहनांना थांबवून त्यांची चौकशी केली.

प्रवासी मुंबई येथीन आल्यामुळे त्यांना वाहनांमधून उतरवून एका ठिकाणी बसविण्यांत आले. त्या ठिकाणी त्यांना कोरोनाबाबत माहिती देण्यात आली. तसेच येथील वैद्यकिय पथाकाद्वारे जागेवरच त्यांची तपासणी करण्यात आली.

ही कारवाई बाजारपेठ पो.स्टे.चे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, एएसआय एजाज पठाण, एएसआय गयासोद्दीन शेख, बंटी कापडणे, प्रशांत परदेशी, सचिन पोळ आदींनी केली. प्रवास करणार्‍या या 55 ते 60 या प्रवाशांचे जेवणासाठी हाल न होण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याचे सूत्रांनी सांगितले. दुपारनंतर प्रवासी पुढच्या वाटेला रवाना झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या