Saturday, March 29, 2025
Homeक्राईममुंबईच्या महिलेची 28 लाखांची फसवणूक

मुंबईच्या महिलेची 28 लाखांची फसवणूक

श्री महालक्ष्मी मल्टीस्टेटच्या 16 संचालकांविरूध्द गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ठेवीवर चांगले व्याज देण्याचे आमिष दाखवून नवी मुंबई येथील महिलेची ठेव व व्याजासहित एकूण 28 लाख 14 हजार 79 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्नेहा राजेंद्र राजपाल (रा. उरण, नवी मुंबई) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, त्यांनी सोमवारी (1 जुलै) कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून श्री महालक्ष्मी मल्टीस्टेट को. ऑफ क्रेडीट सोसायटीच्या (शाखा कापडबाजार, नगर) सर्व संचालक मंडळासह 16 जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 प्रमाणे (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेमा सुपेकर, अशोक गंगाधर गायकवाड, राहुल अरूण दामले, मनिषा दत्तात्रय कुटे, राजेंद्र सुखलाल पराख, अजय चंद्रकांत आकडे, मधुकर मारूतराव मुळे, प्राजक्ता प्रकाश बोरूडे, धैर्यशील जाधव, नागनाथ भिकाजी शेटे, संजय चंद्रकांत खोंडे, चंद्रकांत सुरजमल आनेचा, प्रकाश बाबुलाल बचावत, मच्छिंद्र भिकाजी खाडे, शामराव हरी कुलकर्णी, सुनील रंगनाथ वाघमारे (सर्व रा. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालक मंडळाची नावे आहेत. सदरचा प्रकार 21 मे 2015 ते 30 एप्रिल 2024 दरम्यान घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. स्नेहा राजपाल यांना श्री. महालक्ष्मी मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटीच्या सर्व संचालकांनी ठेवीवर चांगले व्याज देण्याचे आमिष दाखविले.

स्नेहा यांनी त्यांच्यावर विश्वास ठेऊन सदर मल्टीस्टेटमध्ये नऊ लाख 12 हजार 894 रुयांची ठेव ठेवली. स्नेहा यांनी ठेव म्हणून ठेवलेली रक्कम व त्यावरील व्याज असे एकूण 28 लाख 14 हजार 79 रुपयांची मागणी केली असता ठेवीची रक्कम देण्यास संचालक मंडळाने टाळाटाळ केली. संचालक मंडळाने रक्कम देण्यास टाळाटाळ करून कट कारस्थान रचून रकमेचा अपहार केला व फसवणूक केली असल्याचे स्नेहा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्नेहा या सोमवारी फिर्याद देण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात गेल्या असता पोलिसांनी त्यांची फिर्याद दाखल करून घेतली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक योगीता कोकाटे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : बोगस शालार्थ आयडीतून वेतन; शिक्षण उपसंचालकांकडून लेखाधिकारी व...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) दहा शिक्षण संस्थांत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची (Employees) बोगस भरती करून या शिक्षकांना (Teachers) बनावट कागदपत्रांच्या...