Thursday, March 13, 2025
Homeनगरमनपाला सद्यस्थितीत 446 कोटींची देणी

मनपाला सद्यस्थितीत 446 कोटींची देणी

उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजना सुरू || कर भरण्याचे आवाहन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिकेला वीज बिले, कर्मचार्‍यांची देणी, पुरवठादार व ठेकेदारांची देणी यासह शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये स्व:हिस्सा अशी सुमारे 446.80 कोटी रुपयांची देणी आहेत. त्याचा परिणाम विकास कामे रखडण्यावर व नागरी सुविधांवर होत आहे. सदरची देणी येत्या दोन वर्षांत देण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन उपाययोजना करत आहे. मात्र, नागरिकांकडून कर भरणेही अपेक्षित आहे. सध्या देण्यात आलेली शास्ती माफी ही अंतिम संधी आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत शास्तीमध्ये सवलत मिळणार नाही. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या थकीत कराचा भरणा तत्काळ करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

- Advertisement -

महानगरपालिकेच्या सेवा व सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन उत्पन्न वाढविण्याबाबत उपाययोजना करत आहे. सध्याची आर्थिक परिस्थिती सातत्याने नागरिकांसमोर मांडत आहे. आजमितीला महानगरपालिकेला 446.80 कोटी रुपयांचे देणे आहे. यात 1990 पर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पाणी योजना असतानाच्या काळातील जुनी थकीत वीज बिले 250 कोटी, शासकीय योजनांचा स्व:हिस्सा 160 कोटी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी 7 कोटी, पाचवा व सहावा वेतन आयोग फरक 2 कोटी, पथदिवे व पाणी योजनेचे चालू वीजबिल 11 कोटी, अशुध्द पाणी आकार 2 कोटी, पेन्शनर सातवा वेतन आयोग फरक 2 कोटी, निवृत्ती वेतन अंशदान मनपा हिस्सा 3 कोटी, अर्जित रजा वेतन 1 कोटी, वैद्यकीय बिले 50 लक्ष, टँकरव्दारे पाणीपुरवठा 2 कोटी, बससेवा तूट 1 कोटी, कंत्राटी कर्मचारी देयके 1 कोटी, कचरा संकलन देयके 3 कोटी, खतनिर्मिती प्रकल्पाची देयके 1 कोटी, डिसेंबर वेतन कपात 1.50 कोटी, ठेकेदारांची देयके 40 कोटी, पुरवठादारांची देयके 5 कोटी, शिक्षण मंडळ वेतन हिस्सा 1.20 कोटी, दिव्यांग मानधन 1.60 कोटी, इतर देणी 1 कोटी असा 446.80 कोटींचा समावेश आहे.

उत्पन्न वाढवण्यासाठी महानगरपालिका ठोस उपाययोजना करत आहे. मात्र, त्याबरोबरच कर वसुली हा महानगरपालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत असल्याने वसुलीवर अधिक भर देत आहे. थकबाकीदारांना शास्तीमध्ये 100 टक्के सवलत दिली आहे. त्याचा लाभ घेऊन कर भरणे आवश्यक आहे. यापुढे महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत शास्तीमध्ये सवलत देणार नाही. त्यामुळे हीच अंतिम संधी असल्याने नागरिकांनी थकीत कराचा भरणा करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे. वसुलीसाठी महानगरपालिकेने आक्रमक कारवाई सुरू केली आहे. जप्ती कारवाई टाळण्यासाठी तत्काळ कर भरावा, अन्यथा कारवाईशिवाय पर्याय नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...