Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik NMC Election: पहिल्याच दिवशी 'इतके' उमेदवार रिंगणाबाहेर, माघारीला उरले काही तास...

Nashik NMC Election: पहिल्याच दिवशी ‘इतके’ उमेदवार रिंगणाबाहेर, माघारीला उरले काही तास ; बंडोबांना थंडोबा करण्याचे नेत्यांसमोर मोठे आव्हान

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेच्या गुरुवारी (दि.१) पहिल्या दिवशी शहरातील विविध प्रभागांमधून एकूण ५४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. शहरातील ३१ प्रभागांमधून १२२ जागांसाठी एकूण २.३५६ उमेद‌वारी अर्ज दाखल झाले होते. आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून सर्वपक्षीय पक्षनेतृत्त्वाकडून बंडखोरांची मनधरणी सुरू झाली आहे. त्यासाठी बंडखोरांच्या भेटी घेऊन त्यांना भविष्यात न्याय देण्याचे आश्वासन दिले जात आहे. तर काही प्रबळ बंडखोरीला स्वीकृत सदस्य, विषय समित्यांवर वर्णी लावण्याचा शब्द दिला जात आहे. पक्षाच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास बंडखोरांवर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. भाजपमधील बंडखोरांना शांत करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत.

दरम्यान, छाननी प्रक्रियेनंतर त्यापैकी २७७ अर्ज अवैध ठरविण्यात आले होते तर २,०७९ अर्ज वैद्य उरले होते. त्यातून काल ५४ अर्ज माघारी झाले, माघारीमुळे काही प्रभागांतील उमेद‌वारांची संख्या कमी होऊन निवडणूक लढतीचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे.

- Advertisement -

मात्र, आज माघारीची अंतिम मुदत असून, त्यानंतर खरे चित्र समोर येणार आहे. माघारीसाठी दुपारी ३ पर्यंत उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृत सूचक अनुमोदकांनी प्रत्यक्ष निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहून अर्ज सादर केले. पहिल्या दिवशी सकाळपासूनच शहरा तील सर्व दहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये उमेदवार, पक्ष पदाधिकारी व कार्यकत्यांची गर्दी दिसून आली. पक्षांतर्गत चर्चा, समन्वय बैठकांनंतर अनेक ठिकाणी उमेदवारांनी माघार घेतल्याचे चित्र आहे, प्रभागनिहाय पाहता माघारीचे प्रमाण असमान राहिले.

YouTube video player

प्रभाग क्रमांक १, ३, ६, ७, ८, ९ आणि १० मध्ये प्रत्येकी एक उमेदवाराने माघार घेतली. प्रभाग ११ मध्ये तीन, प्रभाग १३ मध्ये तीन, तर प्रभाग १४ मध्ये चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. प्रभाग २० मध्ये तीन, प्रभाग २१ मध्ये पाच, प्रभाग २४ मध्ये पाच, प्रभाग २५ मध्ये चार, प्रभाग २८ मध्ये चार आणि प्रभाग २९ मध्ये तीन उमेदवारांनी माघार घेतली. काही प्रभागांत पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. माघारीच्या पहिल्या दिवसानंतरही अनेक प्रभागांत बहुरंगी लढती कायम असून, आज आणखी माघारी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम उमेद‌वारांची संख्या आणि निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.

Nashik Politics: माघारीसाठी आज अंतिम मुदत; गुप्त बैठकांना वेग, दुपारनंतर चित्र होणार स्पष्ट

गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल
उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. उमेदवारी अर्ज मिळावा यासाठी इच्छुकांकडून आमदारांच्या गाडीचा पाठलाग करण्यात आला होता तर एका फार्म हाऊसवरच इच्छुकांनी राडा घातला होता. त्यातच काही उमेदवारांना दोन ते तीन एबी फॉर्म वाटण्यात आले होते, ज्यावरुन शहरातील अन्य इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान यानंतर काहींचे अर्ज छाननीत बाद ठरवण्यात आल्याने उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. अशा अपक्ष उमेदवारांचा फटका अधिकृत उमेदवारांना बसू नये यासाठी अपक्षांनी माघार घ्यावी यासाठी मंत्री गिरीश महाजन शहरात दाखल झाले असून ते बंडखोरांशी बातचित करुन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे भाजपचे संकटमोचक महाजन हे आपल्या पक्षातील बंडखोरांना कसे थंड करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नाराज राजी कसे होणार?
नाराज इच्छुकांनी मात्र केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसल्याचे संकेत दिले आहेत. अनेकांनी उमेदवारी प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत, खरा सर्व्हे कोणता आणि तो कोणी केला, याबाबत खुलासा करण्याची मागणी केली आहे. काही इच्छुक अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचेही बोलले जात आहे. गिरीश महाजन यांच्या या दौऱ्यामुळे भाजपमध्ये हालचालींना वेग आला असून, माघारीचा अंतिम दिवस पक्षासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

माजी महापौरांची माघार
काल उमेदवारी अर्ज माधारीच्या पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक १३ ‘क’ या सर्वसाधारण गटातून माजी महापौर यत्तीन वाघ यांच्यासह शेख सलीम युसुफ व राष्ट्रवादी (सपा) थे शहराध्यक्ष गजानन शेलार या अपक्ष उमेदवारांनी माधार घेतली.

सातपूर विभागातील सहा उमेदवारांनी घेतली माघार
सातपूर विभागातील चार प्रभागांतील महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अजर्जाची छाननी प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली, या प्रक्रियेत १७२ उमेदवारांचे २५८ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले असून ३७ अर्ज बाद करण्यात आले आहेत. उमेदवारी माघारीसाठी गुरुवार (दि. १) व शुक्रवार (दि. २) असे दोन दिवस निश्चित करण्यात आले असून, माघारीच्या पहिल्याच दिवशी सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

प्रभाग क्रमांक ८ : ३४ उमेदवारांचे ६० अर्ज, प्रभाग

प्रभाग क्रमांक ११:५९ उमेदवारांचे ८९ अर्ज प्रत्येक प्रभागात चार जागांसाठी निवडणूक होणार असून, सध्या क्रमांक ९ २२ उमेदवारांचे ३१ अर्ज, प्रभाग क्रमांक १० ५७ उमेदवारांचे ७५ अर्ज, अर्जाच्या संख्येवरून चुरशीच्या व बहुरंगी लढती अपेक्षित आहेत.

दरम्यान, माघारीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (दि. १) मनीषा लासुरे, कल्पेश खांडेकर, सार्थक नागरे, सुजाता काळे, हर्षल काळे आणि मनीषा मौले यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. राजकीय वर्तुळात सध्या माघारीसाठी तडजोडीच्या चर्चा सुरु असून काही अपक्ष उमेदवार अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे. आज शुक्रवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात माघार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, अन्यथा मतविभाजनासोबतच अनामत रकमेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, त्यामुळे अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या अनेक उमेद‌वारांकडून आज माघार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माघारीनंतरच प्रत्येक प्रभागातील प्रत्यक्ष निवडणूक लढतीचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे.

पंचवटीत ५ उमेदवारांची माघार
पंचवटी परिसरातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज माघ ारी घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यात एकूण पाच उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संबंधित प्रभागांतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंचवटी। पंचवटी परिसरातील पंचवटीतील प्रभाग १, २ आणि ३ मधून दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण तीन अर्ज माघारी घेण्यात आले. प्रभाग १ (ड) मधून सुनील निरगुडे, प्रभाग ३ (ड) मधून कुणाल गोवर्धने, तसेच प्रभाग ३ (अ) मधून सुमन माने यांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. माने यांचा अर्ज हा डमी असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे पंचवटी प्रभाग ४, ५ आणि ६ मधूनही अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू असून, या गटातून दुपारी ३ वाजेपर्यंत दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे. प्रभाग ४ (ड) मधून आबासाहेब भडांगे, तर प्रभाग ६ (क) मधून विद्या पिंगळे यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आ हेत. अर्ज माघारी घेतल्यामुळे आता अनेक प्रभागांत थेट लढती स्पष्ट होत असून, काही ठिकाणी प्रमुख पक्षांचे उमेदवार आमनेसामने येण्याची शक्यता वाढली आहे. माघारीची अंतिम मुदत संपल्यानंतर येत्या काळात प्रचाराला अधिक वेग येणार आहे. पंचवटीतील निवडणूक रणधुमाळी आणखी रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

इंदिरानगर भागातून तीन उमेदवार यांची माघार
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माघारीच्या पहिल्या दिवशी (दि.१) प्रभाग २३, ३० मधून तीन उमेदवारांनी माघार घेतली. १६ मधून कोणीही माधार घेतली नाही. आज माघारीचा शेवटचा दिवस असून तीन वाजेनंतर खच्या अथर्थाने अपक्ष किती माघार घेतात व किती उमेदवार रिंगणात राहतात याची निश्चिती होणार आहे. फाल प्रभाग २३ ड) मधून संकेत खोडे, प्रभाग ३० क) पूजा देशमुख, ड) मधून अमोल देशमुख यांनी माघार घेतली. त्यामुळे या प्रभागातील संख्या आता १६ मधून ४० उमेदवार, प्रभाग २३ मधून ४२ उमेदवार तर प्रभाग ३० मधून ४७ उमेदवार बाकी राहिले आहेत.

नाशिकरोडला १२ उमेदवारांची माघार
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी नाशिकरोडच्या सहा प्रभागामधून १२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शुक्रवार (दि. २) शेवटचा दिवस असून आज मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज येणाऱ्यांमध्ये पुढील उमेदवारांचा समावेश आहे प्रभाग क्रमांक १७ मधून योगेश कपिले व कैलास आदाव प्रभाग क्रमांक २० मधून राहुल बागुल संगीता गायकवाड सुनील आइके २१ मधून अपर्णा जाधव, असलम मनियार, संतोष शिरसागर, भावना नारद, सुनील जाचक प्रभाग क्रमांक २२ महेंद्र पोरजे, गौरी साडे या उमेदवारांनी माघार घेतली आहे

ताज्या बातम्या

Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) धामधुमीत शहरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये (BJP) असलेले नाशिकचे दोन माजी...