Friday, September 18, 2026
HomeनगरAhilyanagar : पालिका, नगरपंचायत हद्दीत मालमत्तेचे सर्व्हेक्षण सुरू

Ahilyanagar : पालिका, नगरपंचायत हद्दीत मालमत्तेचे सर्व्हेक्षण सुरू

जिल्हा नियोजन समितीमधून निधीः डॉ. आशिया

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगरपालिका व नगरपंचायत हद्दीतील मालमत्तांपासून मिळणारे उत्पन्न कमी झाले होते. त्याबरोबर नव्याने होणार्‍या मालमत्तांची नोंद नाही, वाढवी मालमत्तांची देखील नोंद नाही, त्यामुळे पालिकांची वसुली चांगली असली तरी उत्पन्न मात्र, कमी अशी स्थिती आढळून आल्याने त्यात उत्पन्नात वाढ करण्याच्यादृष्टीने पालिका हद्दीत खासगी संस्थांमार्फत मालमत्तेचे सर्व्हेक्षण करण्याचे काम सुरू आहे. पुढील वर्षा नव्याने कराची आकारणी झाल्यानंतर पालिकांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसले, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालय याच्या संयुक्त विद्यमान माध्यम संवाद या उपक्रमांत जिल्हाधिकारी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कर्जत, कोपरगाव, शेवगाव, पारनेर, जामखेड व राहुरी या पालिकांना खास जिल्हा नियोजन समितीमधून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी निधी उपलब्ध करून दिला असून त्या निधीतून मालमत्तेचे सर्व्हेक्षणाचे काम सध्या सुरू आहे. श्रीगोंदा, शिर्डी पालिकांनी स्वखर्चाने असे सर्व्हेक्षण सुरू केले आहे. सध्या पालिकांची वसुली 65 ते 70 टक्के आहे. त्यात वाढ करण्याचा प्रयत्न आहे. घनकचरा व्यवस्थापनावर देखील पालिका हद्दीत प्रभावी काम सुरू आहे. देवळाली प्रवरा, शिर्डी, राहाता, संगमनेर या पालिकामध्ये चांगल्या पद्धतीने काम होत आहे.

डिसेंबर ते जानेवारी दरम्यान सर्व पालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थानाचे काम केले जाणार आहे. सध्या जामखेडमध्ये कचरा डेपोची अडचण आहे. बाकी सर्व पालिका हद्दीत तो प्रश्न नसल्याचे सांगून डॉ. आशिया म्हणाले की, कर्मचार्‍यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असून त्यासाठी पालकमंत्र्यांच्या मंजूरीनंतर प्रक्रिया प्रकल्पांसाठी निधी पालिकांना देण्यात येणार आहे. कचरा संकलनासाठी पालिकांमध्ये 138 घंटागाड्या असल्याचे ते म्हणाले.

6 हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण
पालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याच्या दृष्टीने संस्थांनी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका क्षेत्रात काम होत आहे. 15 हजार 689 भटक्या कुत्र्यांची संख्या असून त्यापैकी 6 हजार 73 कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले आहे. त्यात शेवगाव पालिका हद्दीत 80 टक्के काम झाल्याचे डॉ. आशिया यांनी स्पष्ट केले.

महिनाअखेरीस जामखेडमधील अतिक्रमणे हटविणार
जामखेड शहरातील महामार्गवरील अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. याचिकाकर्त्यांची याचिकाच फेटाळण्याने आता अतिक्रमण हटविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर 29 सप्टेंबरला महामार्गवरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहे. त्यानुसार नोटिसा देखील बजावण्यात आल्याचे डॉ. आशिया यांनी सांगितले.

कापूरवाडी प्रकरणी दंड देखील वसुली होणार
कापुरवाडी उत्खनन प्रकरणी सहाजणांवर गुन्हे दाखल तर केले आहेत. मात्र, त्यांच्याकडून यापूर्वी झालेली दंडात्मक कारवाईचा दंड देखील वसुली केला जाणार आहे. येत्या 15 दिवसात कारवाईची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सरपंचच ग्रामपंचायतींवर प्रशासक हवेत; न्यायालयात याचिका

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरपंचाचीच पुन्हा नियुक्ती करावी, या मागणीसाठी सरपंच परिषदेच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने परिस्थिती ‘जैसे...