Wednesday, July 24, 2024
Homeमुख्य बातम्यामनपा करणार शहरात 1 लाख वृक्षारोपण

मनपा करणार शहरात 1 लाख वृक्षारोपण

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

‘स्वच्छ नाशिक, हरित नाशिक’चे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून आता नाशिक महापालिकेच्या वतीने शहरात 1 लाख वृक्षारोपण (tree plantation) करण्यात येणार आहे. यासाठी विविध सामाजिक संस्थानी प्रतिसाद दिला आहे.

पांडवलेणी परिसरातील (Pandavaleni area) चित्रपट महर्षि दादासाहेब फाळके स्मारक (Dadasaheb Phalke Memorial) व बुध्द विहार येथे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. नाशिक (Indian Oil Corporation Ltd. Nashik) यांच्या सीएसआर फंडातून (CSR Fund) इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि., नाशिक व नाशिक महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळ, वड, कदंब, कडुनिंब, करंज, चिंच व अर्जुन सादडा या देशी प्रजातीच्या एकूण 1502 वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी नाशिक महापालिका उद्यान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंढे (Vijayakumar Mundhe, Deputy Commissioner of Nashik Municipal Park Department), डॉ. मयुर पाटील (वृक्ष अधिकारी, नविन नाशिक), इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे समिशकुमार, हेमलता नागदेव, जी. एस. पी. सिंग आदी अधिकारी उपस्थित होते. वृक्षारोपणाचे काम देखील प्रगति पथावर असून 50 हजार वृक्षारोपण हे सीएसआर फंडातून केले जात आहे.भारत पेट्रोलियम कंपनी देखील वृक्षारोपणासाठी इच्छुक आहे. या कंपनीला देखील महापालिकेच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आनंदवल्लीत नदीकिनारी पर्यावरण संवर्धन समितीच्या (Environment Conservation Committee) वतीने 2000 वृक्षांची लागवड केली जात आहे.

अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या वतीने देखील विविध जातीची 2000 रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर पुण्यातील देवराई नर्सरी येथून 1365 रोपे प्राप्त झाली असून यामध्ये पिंपळाची 850, पेरु 125, आंबट चिंच 40, तामण 350 रोपे प्राप्त झाली आहे. 1 लाख वृक्षारोपण मोहिमेत विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये, शासकीय परिसरात वृक्षारोपण केले जाणार आहे.

हरित नाशिक संकल्पना पूर्ण करण्यासाठी नाशिकरोड, पश्चिम, पूर्व, पंचवटी, नविन नाशिक अशा सहाही विभागांत वृक्षारोपण केले जाणार आहे. मनपा आयुक्त रमेश पवार यांच्या सूचनेनुसार उद्यान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंढे वृक्षारोपण मोहीम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे. केवळ वृक्षारोपण करण्यावरच महानगरपालिकेचा भर नसून वृक्षारोपण केलेल्या झाडांची देखभाल करण्यासाठी देखील महापालिका प्रयत्नशील आहे. वृक्षारोपण करणार्या संस्थांनी स्वपुढाकाराने वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष देखभालीची देखील जबाबदारी घेतली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या